१. मला माझ्या मोबाइलमधील माहिती लॅपटॉपवर घ्यायची आहे, त्यासाठी काय करावे लागेल. माझ्या मोबाइलबरोबर मला कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर देण्यात आलेले नाही – सुरेश आगाशे
उत्तर – मोबाइलमधून लॅपटॉपवर माहिती घेत असताना तुम्हाला सर्वप्रथम डेटा केबलने मोबाइल लॅपटॉपशी जोडून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही मोबाइलमध्ये संगणकजोडणी स्वीम केल्यानंतर आपण पेनड्राइव्ह लावल्यातनंतर जो बॉक्स समोर येतो. तसाच बॉक्स समोर येतो आणि त्यातून तुम्ही ओपनचा पर्याय स्वीकारू शकतात. तसे होत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाइलमधील माहिती तुमच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह करा आणि त्यानंतर मेमरी कार्ड काढून ते कार्डरीडरच्या साह्य़ाने संगणकाला जोडा. म्हणजे तुम्हाला तुमची माहिती संगणकावर घेता येईल. याशिवाय आणखी एक पर्याय म्हणजे तुमचा मोबाइल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तेथून संगणक जोडणी सॉफ्टवेअर तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.
२. मला माझे व्हॉट्स अ‍ॅपचे संदेश ई-मेल करायचे आहे. कसे करता येतील. – संजीव देशपांडे
उत्तर : व्हॉट्स अ‍ॅपचे संदेश ईमेलवर पाठविणे सोपे आहे. तुम्हाला ज्या व्यक्तींचे किंवा ज्या ग्रुपवरचे संदेश ई-मेल करावयाचे आहेत त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे नाव तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपवर शोधा. त्यानंतर ते ओपन करून पर्यायामध्ये जा. तेथे मोअरमध्ये जा. मग तुम्हाला ‘क्लिअर कन्व्‍‌र्हसेशन’, ‘ई-मेल कन्व्‍‌र्हसेशन’ आणि अ‍ॅट शॉर्टकट असे पर्याय येतील. यातील ‘ई-मेल कन्व्‍‌र्हसेशन’ हा पर्याय निवडून तुम्ही सर्व संवाद ई-मेल करू शकता.
या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.