06 July 2020

News Flash

‘विंडोज १०’ भारतीय ग्राहकांना आकर्षित करेल का ?

विंडोज ८ चा प्रयत्न फसल्यानंतर नव्याने येणा-या आवृत्तीची उपयुक्तता पटवून देत ग्राहकांना जोडण्याचे आव्हान समोर असल्याने विंडोजची अधिकृत आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना नवीन आवृत्ती मोफत उपलब्ध

| June 2, 2015 05:29 am

विंडोज ८ चा प्रयत्न फसल्यानंतर नव्याने येणा-या आवृत्तीची उपयुक्तता पटवून देत ग्राहकांना जोडण्याचे आव्हान समोर असल्याने विंडोजची अधिकृत आवृत्ती वापरणा-या ग्राहकांना नवीन आवृत्ती मोफत उपलब्ध देण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. मायक्रोसॉफ्टच्या संकेत स्थळावरुन नवीन आवृत्ती डाऊनलोड करता येईल. विंडोजची बनावट आवृत्ती वापरणा-यांना घरगुती वापराच्या आवृत्तीसाठी ११९ डॉलर तर व्यवसायिक वापराच्या आवृत्तीसाठी १९९ डॉलर मोजवे लागतील. भारतीय चलनात ही रक्कम घरगुती वापराच्या आवृत्तीसाठी ८ हजार आणि व्यवसायिक वापराच्या आवृत्तीसाठी १२ हजार इतकी असू शकते. स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी तसेच पायरसी पासून वाचण्यासाठी आणि ग्राहकांना धरुन ठेवण्याच्या उद्देशाने नवीन आवृत्तीची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी ठेवावी लागणार असून अंदाजे ४९९९ रुपयांपर्यंत कमी दरात नवीन आवृत्ती बाजारात उपलब्ध करून द्यावी लागेल. त्याचप्रमाणे विंडोज १० आवृत्ती असलेले फोन, टॅबलेट्स आणि संगणकही मायक्रोसॉफ्ट बाजारात आणणार असल्याने ग्राहकांसाठी ही दुहेरी पर्वणी ठरणार आहे. फुसका बार ठरेलेले विंडोज ८ चे अपयश झाकून नवीन आवृत्तीची उपयुक्तता ग्राहकांना पटवून देणे तसेच ही आवृत्ती वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हे मायक्रोसॉफ्ट समोरचे माठे आव्हान ठरणार आहे. विंडोच ८ मध्ये काढून टाकलेला स्टार्ट मेन्यू नवीन आवृत्तीत परत दिसणार असल्याने ग्राहकांना दिलास मिळणार आहे. तसेच ‘ऐज’ नावाचा अद्यावत ब्राऊजर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विंडोज १० मध्ये असलेली ‘एक्स बॉक्स लाईव’ आणि एक्स बॉक्स अप भारतीय ग्राहकांना तितकेसे भुलवू शकणार नाही त्यामुळे याचा कितपत फायदा होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल. अशा अनेक पातळींवर विंडोज १० मध्ये त्रुटी आढळून येतात. केवळ विंडोज ८ मधील काही चुकांची दुरुस्ती करून मायक्रोसॉफ्टने विंडोजचे हे नवीन व्हर्जन बाजारात आणल्याचे भासते. त्यामुळे आवाजवी प्रतिमा तयार करुन पुन्हा एकदा अपयशाला तोंड द्यावे लागणार नाही याची काळजी मायक्रोसॉफ्टला घ्यावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 5:29 am

Web Title: windows 10 how will microsoft convince india users to upgrade
टॅग Microsoft
Next Stories
1 ‘विंडोज १०’ची प्रतिक्षा संपली
2 १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ‘झेनफोन सेल्फी’ दाखल
3 स्वस्तातले ‘लॉलिपॉप’
Just Now!
X