व्यवस्था आहे. मात्र भारतीय रस्त्यांच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. भारतीय रस्त्यांच्या फीडस्च्या संदर्भात अजूनही बऱ्याच गोष्टी होणे बाकी आहे. मात्र आता अनेक भारतीय कंपन्यांनी आणि काही विदेशी कंपन्यांनीही त्यात विशेष पुढाकार घेतला असून नवीन अॅप्स आणि नेविगेशन सिस्टिम तयार केली आहे. या पाश्र्वभूमीवर आता गार्मिनने नुवी ४० एलएम नेविगेशन यंत्रणा बाजारात आणली आहे. खासकरून भारतीय रस्त्यांसाठी ती विकसित करण्यात आली आहे. केवळ १४८ ग्रॅम्स एवढेच त्याचे वजन असून तिचा डिस्प्ले स्क्रीन ४.३ इंचाचा आहे. यामध्ये भारतातील रस्त्यांचे नकाशे प्रीलोडेड स्वरूपात देण्यात आले असून ते सातत्याने अपडेटही केले जातात. गार्मिन नुवीमॅप्स लाइफटाइम मार्फत हे अपडेशन केले जाते.
गाडी चालवताना होणारी एक महत्त्वाची अडचण म्हणजे कायम रस्त्यावर नजर खिळलेली असते अशा अवस्थेत आपण फोनही घेऊ शकत नाही. म्हणजे डटाइम मार्फत हे अपडेशन केले जाते.
गाडी चालवताना होणारी एक महत्त्वाची अडचण म्हणजे कायम रस्त्यावर नजर खिळलेली असते अशा अवस्थेत आपण फोनही घेऊ शकत नाही. म्हणजे ड्रायव्हिंगकडे दुर्लक्ष्य होईल, असे कोणतेही काम आपण करू शकत नाही. हे लक्षात घेऊनच या यंत्रणेमध्ये हिंदूी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये व्हॉइस कमांडची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे या नेविगेशन यंत्रणेशी तुम्हाला थेट संवाद साधता येईल आणि रस्त्यावर नजर खिळलेली राहील.
याशिवाय जंक् शन व्ह्य़ू, लेन इन्फो, हायवे मोड, हाऊस सर्च, गो टू ऑफिस, गो होम आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. याची बॅटरी तब्बल दोन तास व्यवस्थित चालते, असा कंपनीचा दावा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ८,४५०/-
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
भारतीय रस्त्यांसाठी गार्मिन नुवी ४० एलएम
रस्ता शोधणे हा अनेकदा नवा व्याप असतो. अलीकडे मात्र जीपीएस नेविगेशन प्रणालीमुळे काम थोडे सोपे झाले आहे. पण त्यातही ते युरोप- अमेरिकेसाठी अधिक चांगले आहे. कारण तिथे रस्त्यांचे नेविगेशन आणि आरेखन दोन्ही उत्तम पद्धतीने करण्यात आलेले असून ते यंत्रणेमध्ये व्यवस्थित फीडही केलेले आहे. त्यामुळे रस्ता किंवा घर चुकणे शक्यच नाही, अशी

First published on: 25-12-2012 at 01:02 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garmin nevi 40 lm