ज्यांना पहिला मोबाईल घ्यायचा आहे त्यांनी तो कमी किमतीचा घ्यावा, नंतर मग हळूहळू स्मार्टफोनपर्यंत जायला हरकत नाही. तर जे लोक पहिल्यांदाच मोबाईल घेणार आहेत त्यांच्यासाठी नोकियाने १२४९ रूपयांत उत्तम दर्जाचा मोबाईल फोन उपलब्ध करून दिला आहे. अर्थात तो कमी उत्पन्न गटासाठी आहे. कमी किंमत रंगीत स्क्रीन ही त्याची वैशिष्टय़े आहेत. नोकिया १२८० या फोनची विक्री १० कोटी झाली होती, त्याचाच वारसदार असलेला नोकिया १०५ हा नेहमीच्या गरजा पूर्ण करणारा आहे.
तो काळ्या व पांढऱ्या रंगात उपलब्ध असून त्याचे डिझाइनही चांगले आहे. म्हणायला आधुनिक पण पारंपरिक असा हा फोन असल्याचे नोकियाचे अधिकारी विरल ओझा यांनी सांगितले. पहिल्यांदाच मोबाईल विकत घेणाऱ्यांसाठी हा अतिशय आदर्श फोन आहे. त्याचा की बोर्ड हा धुळीपासून संरक्षण करणारा आहे. बॅटरीचे आयुष्य महिनाभर आहे, नोकिया १०५ हा बॅक अप फोन म्हणून वापरता येऊ शकतो, म्हणजे जेव्हा स्मार्टफोन बाहेर न्यायचा नसेल तेव्हा हा फोन वापरता येईल.
नोकिया १०५ ची वैशिष्टय़े
स्क्रीन : १.४५ इंच
एफएम रेडिओ
पाच गेम्स
अलार्म क्लॉक्स
स्पीकिंग क्लॉक (बोलणारे घडय़ाळ)
फ्लॅश लाइट
एज्युकेशन व हेल्थ टिप्स लाइफ सव्र्हिस
टॉक टाइम १२.५ तास
स्टँड बाय टाइम ३५ दिवस.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2013 रोजी प्रकाशित
नोकियाचा नवीन ग्राहकांसाठी नवा फोन : नोकिया १०५
ज्यांना पहिला मोबाईल घ्यायचा आहे त्यांनी तो कमी किमतीचा घ्यावा, नंतर मग हळूहळू स्मार्टफोनपर्यंत जायला हरकत नाही. तर जे लोक पहिल्यांदाच मोबाईल घेणार आहेत त्यांच्यासाठी नोकियाने १२४९ रूपयांत उत्तम दर्जाचा मोबाईल फोन उपलब्ध करून दिला आहे.
First published on: 10-05-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New phone for new customer by nokia nokia