पायोनीअर इंडिया इलेक्ट्रॉनिक्स इंडिया या कंपनीने स्टायलिश असे एचडीजे 500 हेडफोन बाजारात आणले आहेत. हे हेडफोन घरात बसून किंवा क्लबमध्ये गाणी ऐकण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या कंपनीने आतापर्यंत तयार केलेले हेडफोन्स हे डीजेच्या दृष्टीने विकसित केलेले होते. आता ते सामान्यांनाही वापरता यावेत या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. यामध्ये दोन विविध प्रकारच्या कॉड्स देण्यात आल्या आहेत. यातील एक कॉड डीजेइंगसाठी तर एक कॉड वैयक्तिक वापरासाठी देण्यात आली आहे. या हेडफोनची फ्रीक्वेन्सी ही पाच हर्ट्झ ते २८ हजार हर्ट्झपर्यंत असणार आहे. याची जाणीव क्षमता ही १.५ डेसिबल इतकी आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमत- ८५९० रुपये.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pioneer hdj 500 speaker
First published on: 08-11-2014 at 02:04 IST