अॅपल या सुप्रसिद्ध मोबाईल निर्मात्या कंपनीचा बहुप्रतिक्षीत ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७ प्लस’ फोनचे छायाचित्र लिक झाले आहे. लिक झालेल्या छायाचित्रानुसार ‘आयफोन ७’ चे डिझाईन हे ‘अॅपल’च्या याआधीच्या ‘आयफोन ६’ फोनच्या डिझाईनशी मिळतेजुळते आहे. फक्त ‘आयफोन-६’ च्या डिझाईनमध्ये फोनच्या मागील बाजूस असणारी आडवी पांढऱया रंगाची पट्टी ‘आयफोन-७’ मध्ये देण्यात आलेली नाही.
‘आयफोन ७’ चा मागील भाग पूर्णपणे सलग ठेवण्यात आला असल्याचे या छायाचित्रात दिसून येते. हे छायाचित्र चीनच्या Weibo या लोकप्रिय संकेतस्थळाने प्रसिद्ध केले असून ते letemsvetemapplem.com ने टिपल्याचे नमूद करण्यात आले आहे.

iphone-7

‘आयफोन ७’ च्या लिक झालेल्या फिचर्सनुसार, अॅपल कंपनी या फोनमधून दोन रिअर कॅमेरा देण्याचा नवा पायंडा सुरू करणार आहे. याशिवाय आयफोन ७ प्लसमध्ये ३ जीबीची रॅम देण्यात येणार असल्याची माहिती केजीआय सेक्युरिटीचे सुप्रसिद्ध विश्लेषक मिंग-चि क्यू यांनी दिली आहे. आयफोन ७ च्या अपडेटेड व्हर्जनला ‘आयफोन ७ प्रो’ हे नाव देण्यात असल्याचे वृत्त देखील खोडून काढण्यात आले आहे. ‘आयफोन ७’ चे पुढील व्हर्जन हे ‘आयफोन ७ प्लस’ याच नावाने बाजारात दाखल होईल, असे सांगण्यात येत आहे.