News Flash

लॅप‘टॉप’

अगदी टॅब असला तरी कळफलकाशिवाय काम करणे आजही अनेकांना अवघड जात आहे.

संवादासाठी आवश्यक गोष्टींबरोबर कार्यालयीन कामकाजाचाही भार हलका करणारा मोबाइल आपल्या खिशात असला तरी लॅपटॉपची गरज आजही कायम आहे. अगदी टॅब असला तरी कळफलकाशिवाय काम करणे आजही अनेकांना अवघड जात आहे. तसेच एका मर्यादेनंतर मोबाइलच्या स्क्रीनवर काम करणे हे त्रासदायक वाटते व लॅटपटॉपमधील सर्वच सुविधा मोबाइलमध्ये मिळणेही अवघड असते. यामुळे आजही लॅपटॉपला मागणी आहे. २०१७ मध्ये बाजारात येणाऱ्या लॅपटॉपची एक झलक पाहू या.

सॅमसंग क्रोमबुक प्लस

विंडोज लॅपटॉप आणि अँड्रॉइड टॅबलेटला पर्याय म्हणून सॅमसंग क्रोमबुक प्लसकडे पाहिले जात आहे. या क्रोमबुकमध्ये गुगल प्ले स्टोअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध असलेली सर्व अ‍ॅप्स यामध्ये वापरता येणार आहेत. यामध्ये डिजिटायझर स्टायलस देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये मोबाइल अ‍ॅप आणि लॅपटॉपवर काम करणारे अ‍ॅप यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी यामध्ये कॉन्टेक्स्ट मेन्यू देण्यात आला आहे. ज्याच्या माध्यमातून मोबाइलवर चालणारे अ‍ॅप्स क्रोमबुकवर काम करू शकणार आहेत. यात २४०० बाय १६००चा डिस्प्ले देण्यात आला आहे. ता याचे वजन दीड किलोच्या आत आहे. यात चार जीबी रॅम, ३२जीबी साठवणूक क्षमता, ओपी१ चिप देण्यात आले आहे. यामुळे हा टॅबपेक्षा जलद काम करू शकणार आहे.

एचपी इलाइट बुक एक्स ३६०

dसर्वोत्तम हार्डवेअर उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या एचपी या कंपनीने या वर्षांत इलाइट बुक एक्स ३६० बाजारात आणण्यचा निर्णय घेतला आहे. आय ५ प्रोसेसर आणि आठ जीबी रॅम देण्यात आलेल्या या लॅपटॉपमध्ये संगणक सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये बायोमेट्रिक स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॅपटॉपच्या कॅमेरालाही विंडोज हॅलो तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षा पुरविण्यात आली आहे. याचबरोबर या लॅपटॉपची स्क्रीनही सुरक्षित ठेवण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. याचबरोबर एचपीने स्पेक्ट्रे एक्स ३६० हा लॅपटॉपही बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. यात १५ इंच स्क्रीनचा लॅपटॉप देण्यात आला असून त्यात फोर के डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे वजन साधारणत: दोन किलो इतके असणार आहे. यात कोर आय ७ प्रोसेसर, १६ जीबी रॅम देण्यात येणार आहे.

डेल एक्सपीएस

cडेल एक्सपीएस १३ ने २०१६ मध्ये तंत्रप्रेमींची मने जिंकली होती. या वर्षांत डेल एक्सपीएस २ इन १ हा लॅपटॉप बाजारात येणार आहे. नेटबुक आणि मोठा लॅपटॉप यांच्या मधील दुवा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कमी इंचांच्या लॅपटॉपच्या गटात हा लॅटपटॉप बसतो. डेलचा हा लॅपटॉप १३.३ इंचांचा असून यात पूर्णत: एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. यात कळफलक तर देण्यात आला आहेच शिवाय यामध्ये टचस्क्रीनची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही पर्यायांचा वापर करून तुम्ही यामध्ये काम करू शकता. तसेच टचस्क्रीनवर काम करण्यासाठी विशेष स्टायलसही देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये आय ७ किंवा आय ५ प्रोसेसरचा पर्याय देण्यात आला आहे. तर एचडी ६१५ ग्राफिक कार्ड देण्यात आले आहे. तसेच एक टीबी साठवणूकक्षमता असलेली हार्डडीस्क व १६ जीबी रॅम देण्यात येणार आहे. यामुळे हा लॅटपटॉप २०१७ मधील लोकप्रिय ठरू शकतो अशी तज्ज्ञांना अपेक्षा आहे.

असूस जीएल ५०२

aमदरबोर्ड विकसित करणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांपैकी एक असूस या कंपनीचे लॅपटॉप हे बाजारात काही चांगल्या दर्जाच्या लॅपटॉपच्या यादीत आहेत. या कंपनीने सुरुवातीला मध्यम आकाराचे लॅपटॉप बाजारात आणले आणि ग्राहकांना आकर्षित केले. ही कंपनी या वर्षांत जीएल ५०२ हा लॅपटॉप बाजारात आणणार आहे. हा नवा लॅपटॉप कंपनीच्या गेम्स खेळता येणाऱ्या लॅपटॉपच्या मालिकेतील आहे. यात आय ७ प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. याचबरोबर एनव्हिडीया जीटीएक्स ६०० किंवा १०७० जीपीयू वापरण्यात येणार आहे. गेम खेळण्यासाठी आवश्यक असा जीएल ५०२ फीचर्स आणि १२० मेगाहर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला मॉनिटर देण्यात आला आहे. यामुळे गेम्स खेळताना अधिक चांगला अनुभव घेणे शक्य होणार आहे. आभासी विश्वात रमविणारा छोटा लॅपटॉप म्हणून याची ओळख निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

लिनोवो लीगॉन वाय ७२०

bखास गेम्स खेळणाऱ्यांना समोर ठेवून हा लॅपटॉप विकसित करण्यात आला आहे. यामुळे याला १७ इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये आय ५ किंवा आय ७ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यामध्ये एक्सबॉक्स वन रिसिव्हर अंतर्गत देण्यात आला आहे. पण हा केवळ गेमिंगसाठी वापरात येणार नसून याचा वापर आभासी विश्वातील गोष्टी व्हिडीओज अनुभवण्यासाठीही होणार आहे. यात १०८० पिक्सेलचा फोर के डिस्प्ले देण्यात आला आहे. याचबरोबर डॉल्बी अटोम्स स्पीकरही देण्यात आले आहेत. यामध्ये व्हीआर अपस्केलिंग नावाची विशेष सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आभासी विश्वात नेणारा व्हिडीओ अथवा गेम सुरू झाला की, हेडफोनमध्ये आपोआप बदल होऊन त्यातून येणार आवाज त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऐकू येणार आहे. जेणेकरून आभासी विश्वातील गोष्टींचा अनुभव अधिक चांगला घेता येणार आहे.

नीरज पंडित  nirajcpandit          
Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 5:13 am

Web Title: best laptops
Next Stories
1 फोनची ‘स्पेस’ वाढवा!
2 फोनसाठी ‘स्मार्ट’ वर्ष
3 ‘फीचर फोन’ना पसंती कायम
Just Now!
X