News Flash

‘ई वाचनानंद’

गोष्टी वाचायला कोणाला आवडत नाही?

गोष्टी वाचायला कोणाला आवडत नाही? त्यातून आता दिवाळीची सुट्टी. त्यामुळे शाळा-कॉलेजच्या धबडग्यातून मुलांनाच काय तर आईवडील आणि आजीआजोबांना थोडा निवांतपणा मिळायचे हे दिवस. दिवाळीची खरेदी, फराळ, याचबरोबर मराठी घरात आवर्जून दिसणारी आणखी एक गोष्ट म्हणजे दिवाळी अंक. परंतु बहुतांश वेळा हे अंक मोठय़ा मंडळींसाठी असतात. मग बच्चे कंपनीला गोष्टींसाठी पुस्तकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यासाठी पंचतंत्र, इसापनीती, अकबर-बिरबलाच्या कथा अशी काही पारंपरिक पुस्तके किंवा कार्टुन्सची पुस्तके आवर्जून विकत घेतली जातात. ग्रंथालयाचा मोठा पर्याय त्यांच्यासाठी खुला करून दिलेला असतोच.

याचबरोबर आता जुन्या नव्या अनेक उत्तमोत्तम कथा वाचण्याचा खजिना अँड्रॉईडवर अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आज आपण अशाच काही अ‍ॅपचा परिचय करून घेणार आहोत. गुगल अ‍ॅप स्टोअरवर थोडे फार शुल्क भरून वाचता येण्यासारख्या गोष्टींची अ‍ॅप्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेतच. आपण मात्र फक्त विनामूल्य असलेली हिंदी व इंग्रजी भाषेतील गोष्टी असलेल्या अ‍ॅप्सचीच माहिती घेणार आहोत. तुम्हाला मराठी अ‍ॅप्ससुद्धा शोधता येतील.

पूर्वी विक्रम वेताळाच्या गोष्टी असलेली एक मालिका दूरदर्शनवर दाखवली जात होती. यामधे एकूण २५ गोष्टींचा समावेश होता.

१) मोबिस्क्रीनच्या Vikram Betaall या अ‍ॅपच्या माध्यमातून या गोष्टी तुम्ही वाचू शकता.  [ https://play.google.com/store/apps/details?id=com.mobiscreen.betaal ]

२) अभिव्यक्ती अ‍ॅप्सच्या Sinhasan Battisi in Hindi या अ‍ॅपमधे महाराजा विक्रमादित्याचे गुणवर्णन करणाऱ्या ३२ गोष्टी वाचायला मिळतील [https://play.google.com/store/apps/details?id=com.abhivyaktyapps.hindi.sinhasan.battisi ]

३) सी. बी. इंटरनॅशनलच्या Rabindranath Tagore in Hindi या अ‍ॅपमध्ये रवींद्रनाथांच्या लघुकथा वाचायला मिळतील. [https://play.google.com/store/apps/details?id=com.cbinternational.Rabindranath ]

४) तेनालीरामनच्या बुद्धिचातुर्याच्या कथा आयस्टुडिओजच्या Tenali Ramalinga Tales या अ‍ॅपवर  https://play.google.com/store/apps/details?id=iStudios.tenaliramalingatales ] °FÀFZ¨F Tenali Raman stories (English)  या अ‍ॅपमधे [https://play.google.com/store/apps/details?id=com.stories.raman.thenali.mmsp.tenaliramanstoriesenglish ] इंग्रजीत वाचायला मिळतील.

५) मुल्ला नसरुद्दीन या विनोदी व्यक्तिरेखेच्या हजरजबाबीपणा व वाक्चातुर्याच्या कथा ‘सी. बी. इंटरनॅशनल’च्या ‘मुल्ला नसरुद्दीन (हिंदी)’ या अ‍ॅपमध्ये वाचायला मिळतील. [https://play.google.com/store/apps/details?id=com.cbinternational.mullanasruddin  ]

६) पब्लिक डोमेनच्या ‘द अरेबियन नाइट्स’ या अ‍ॅपमधील गोष्टी वाचताना आपण खरंच एखादे पुस्तक हातात धरून वाचत आहोत असे वाटते. या पुस्तकातील अक्षरांचा आकार कमी जास्त करण्याची सोयदेखील येथे उपलब्ध आहे [https://play.google.com/store/apps/details?id=com.apk.book.AOUXIEZJKZGBEFFTV ]

७) मालगुडी डेज हा आर. के. नारायणन् यांच्या लघुकथांचा संग्रह आहे. या कथा ‘आप४मी’च्या त्याच नावाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून वाचता येतील. [ https://play.google.com/store/apps/ details?id=com.malgudi.book.AOVAQDRXMMGFBGPVF  ]

तेव्हा यावेळची दिवाळी अ‍ॅप्सच्या माध्यमातून ई-गोष्टी वाचून साजरी करणार ना?

 

तांत्रिक शब्द व त्याचे पूर्ण अर्थ

आपल्या नेहमीच्या वापरातले कितीतरी तांत्रिक शब्दांचा फुलफॉर्म आपल्याला ठाऊक नसतो. या शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे –

पीडीएफ (PDF) : अनेकांना पीडीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट

सिम (SIM) : या शब्दाचा वापर ९० टक्के जण करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉडय़ूल असा आहे.

एटीएम (ATM) : याचा वापर तर १० पैकी ८ लोक करतात. एटीएमचा फुलफॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन

वाय-फाय (WI-FI): याचा फुलफॉर्म ‘वायरलेस फिडेलिटी’ असा आहे.

व्हायरस (VIRUS) : कम्प्युटरमध्ये येऊन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स डिस्ट्रॉय करणारा व्हायरस. याचा फुलफॉर्म आहे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सिज

व्हीपीएन (VPN) : व्हीपीएनचा फुलफॉर्म आहे. व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क

एपीएन (APN)- एपीएनचा फुलफॉर्म अ‍ॅक्सेस पॉइंट नेम असा आहे.

रॅम (RAM) – कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी रॅम म्हणजेच रँडम एक्सेस मेमरी

रोम (ROM) – रोम म्हणजेच रीड ओन्ली मेमरी

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2016 1:33 am

Web Title: new android applications
Next Stories
1 कूपन ‘भेट’
2 कलाकारांना ‘सर्च’ करण्याचा  धोका!
3 अ‍ॅपची शाळा : ‘ब्रिलियंट’ व्हा!
Just Now!
X