* अ‍ॅप डाउनलोड करताना अ‍ॅप परमिशन्स विचारल्या जातात. याचा अर्थ काय? त्यापासून काही धोका असतो का? रवींद्र नाईकवडे
* गुगल प्लेवरून अ‍ॅप इन्स्टॉल करताना आपल्याला अ‍ॅप परमिशनची एक खिडकी दिसते. यामध्ये आपण एखादे अ‍ॅप इन्स्टॉल करत असताना आपल्या मोबाइलमधील कोणकोणती माहिती वापरण्याचे अधिकार या अ‍ॅप कंपनीला देतो याची यादी असते. आपण ते सर्व न वाचता अ‍ॅक्सेप्ट करून मोकळे होतो. काही अ‍ॅप्समध्ये त्या अ‍ॅपला आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही परवानगी मागितली जाते. उदाहरणार्थ एखाद्या गेमच्या अ‍ॅपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सची माहिती घेतात. पण प्रत्यक्षात गेम खेळण्याचा आणि कॉन्टॅक्ट्सचा काहीच संबंध नसतो. तसेच एखाद्या अलार्म अ‍ॅपला तुमचे संदेश वाचण्याची गरज नसते. पण अनेक अलार्म अ‍ॅप्समध्ये संदेशासाठीची परवानगी घेतली जाते. यामुळे अशी अनावश्यक माहिती अनोळखी कंपन्यांना जाऊ नये यासाठी अ‍ॅप परमिशन्स नक्की वाचून घ्या. आपण जे अ‍ॅप घेत आहोत त्या अ‍ॅपला खरोखरीच या सर्व गोष्टींची गरज आहे का हेही पडताळून पाहा. कारण गुगल प्लेवरील सर्वच अ‍ॅप सुरक्षित असतात असे नाही. तसेच एखादे नवीन अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्या अ‍ॅपचे रेटिंग तसेच त्याच्यावर वापरकर्त्यांच्या आलेल्या कमेंट्स आपण सहसा वाचत नाही. पण जर त्या वाचल्या तर आपल्याला नक्कीच अ‍ॅपविषयी काही माहिती मिळू शकते.
तंत्रस्वामी

cabinet deputy secretary mrunmai joshi guidance for upsc
माझीस्पर्धा परीक्षा :अभ्यास करावा नेटका…
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र