मोबाइल इन्टेलिजन्ट टर्मिनल प्रोडक्ट्सच्या डिझाइन, निर्माण व मार्केटिंगमध्ये कार्यरत असलेली हाय-टेक एन्टरप्राईझ झोपोने जगातील पहिला जलद डेका-कोअरने युक्त असलेला स्मार्टफोन स्पीड ८ भारतात दाखल केला आहे. ‘झोपो स्पीड ८’ हा हेलिओ एक्सर २०६४-बीट डेका-कोअर सीपीयुद्वारे कार्य करतो. या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोअरेजची सुविधा आहे. याशिवाय आकर्षक मेटल लुकिंग, वक्राकार रचना, आकर्षक डिझाइन असलेल्या या फोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन ५.५ इंच आकाराची असून यात रिव्हर्सिबल टाइप सी यूएसबी पुरवण्यात आला आहे.

झोपो स्पीड ८ मध्ये प्रायमरी कॅमेरा २१.० मेगापिक्सलचा आहे आणि सेकंडरी ८.० मेगापिक्सलचा आहे, ज्यामध्ये डय़ुअल एलईडी फ्लॅश व फ्रंट फ्लॅशचे वैशिष्टय़सुद्धा सामावलेले आहे. या सर्व प्रमुख वैशिष्टय़ांना समर्थन करणारी शक्तिशाली जलद चार्जिग प्रदान करणारी ३६०० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकालीन टॉकटाइमची खात्री प्रदान करते. स्मार्टफोन ऊर्जा-कार्यक्षम स्टॉक एन्ड्रॉईड ६.० मार्शमॅलोवर निर्माण करण्यात आला आहे आणि एनएफसीला (निअर फिल्ड कम्यु्निकेशन) समर्थन करते. या फोनची किंमत २९,९९९ रुपये आहे.