४ जीबी रॅम असलेले, जलदपणे काम करणारे १८००० रुपयांच्या आतील स्मार्टफोनचे पर्याय इथे देण्यात आले आहेत. स्मार्टफोनच्या काम करण्याच्या मंदगतीमुळे अनेक वेळा वापरकर्ता त्रस्त होतो. स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्या सतत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात सुधारणा करत असून स्मार्टफोन किफायतशीरदेखील होत आहेत. जाणून घेऊया १८००० रुपयांच्या आतील जलदगतीने कार्य करणाऱ्या  ४ जीबी रॅम स्मार्टफोन्सची माहिती. तुम्हीसुद्धा काही पर्याय सुचवू शकता अथवा इथे दिलेले पर्याय शेअर करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Moto G5 Plus: मोटो जी५ प्लसमध्ये ५.२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅण्ड्रॉइड प्रणाली नुगा ७ वर हा कार्यरत आहे. २ गेगाहर्टस् ऑक्टाकोर प्रोसेसर, १२ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला हा फोन ३जीबी अणि ४ जीबी रॅम अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत मेमरी असलेल्या मॉडेलची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे.

Xiaomi Redmi Note 4: शिओमीच्या रेडमी नोट ४ फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ५.५ इंच असून या फोनमध्ये २ जीबी, ३ जीबी आणि ४ जीबी रॅम असे पर्याय उपलब्ध आहेत. ४ जीबी रॅम असलेल्या मॉडेलमध्ये ६४ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ४१०० mAH क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत १२,९९९ रुपये इतकी आहे.

Lenovo Z2 Plus: लिनोवो Z2 फोनमध्ये देण्यात आलेला प्रोसेसर हे या फोनचे खास वेशिष्ट्य आहे. यात क्वालकॅम स्नॅपड्रेगॉन ८२० प्रोसेसर देण्यात आल आहे. ५ इंचाचा डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सल तर पुढील बाजूस ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४ जीबी रॅमसोबत ६४ जीबीची अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत १७,४९९ इतकी आहे.

LeEco Le Max 2: लेईको मॅक्स २ या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाचा डिस्प्ले, मागील बाजूस २१ मेगापिक्सल आणि पुढील बाजूस ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, क्वालकॅम स्नॅपड्रेगॉन ८२० प्रोसेसर देण्यात आला आहे. यात अॅण्ड्रॉइडची मार्शमेलो ६ प्रणाली असून, ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत मेमरी असलेल्या या फोनची किंमत १७,९९९ इतकी आहे.

Huawei Honor 6X: हुवाई ऑनर ६ एक्स स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. यातील एक कॅमेरी १२ मेगापिक्सलचा तर दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी पुढील बाजूस ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून, ५.५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले असलेल्या या फोनची किंमत १५,९९९ इतकी आहे.

Gionee S6 pro: जिओनी एस ६ प्रो फोनमध्ये ५.५ इंचाचा १०८० रेझोल्युशन आणि आईपीएस २.५ डी कव्हर्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय १.८ गीगाहर्टस् ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो पी१० (एमटी6755एम) प्रेसेसर, ४ जीबी रॅम, ६४ जीबी अंतर्गत मेमरी जी मायक्रोएसडी कार्डचा वापर करून १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सोय या फोनमध्ये देण्यात आली आहे. या फोनची किंमत १३,९९९ इतकी आहे.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone with 4gb ram price below 18000 rupees moto g5 plus xiaomi redmi note 4 lenovo z2 plu leeco le max 2 huawei honor 6x gionee s6 pro
First published on: 19-04-2017 at 16:11 IST