२०१६च्या जानेवारी ते जून या पहिल्या सहा महिन्यांत भारताते अ‍ॅप्स डाउनलोड करण्याच्या प्रमाणात १६ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अलीबाबा मोबाइल समूहच्या नाईन अ‍ॅप्सच्या डेटानुसार रात्री नऊनंतर अ‍ॅप्स डाउनलोड करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून त्यातही गेमिंगशी संबंधित अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या डेटानुसार भारतातमध्ये सर्वात जास्त अ‍ॅप्स हे रात्री  नऊ वाजता डाउनलोड केले जातात. त्याखालोखाल सोशल नेटवर्किंगशी संबंधित अ‍ॅप, मनोरंजनपर अ‍ॅप, संगीतविषयक अ‍ॅप यांना पसंती दिली जाते. गेमिंग अ‍ॅपमध्येही रेसिंग आणि अ‍ॅक्शन गेम सर्वाधिक डाउनलोड केले जातात. ‘नाइन अ‍ॅप्स’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४६ टक्के भारतीय वापरकर्ते अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी प्ले स्टोअरवरील संबंधित अ‍ॅपचे स्क्रीन शॉट तपासून पाहतात. तर, ३६ टक्के वापरकर्ते इतर वापरकर्त्यांनी दिलेल्या मानांकनाला (रेटिंग) महत्त्व देतात.

‘रिंगिंग बेल्स’चे आता स्वस्त एलईडी टीव्ही

२५० रुपयांत स्मार्टफोन विक्री करण्याची घोषणा करून जगभर खळबळ उडवल्यानंतर काही काळ वादात सापडलेल्या ‘रिंगिंग बेल्स’ कंपनीने आता ९९०० रुपयांत एलईडी टीव्हीची विक्री करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने यासाठी नोंदणी व विक्री सुरू केली असून ३१.५ इंची आकाराचा एचडी एलईडी टीव्ही ग्राहकांच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे.

‘टायटन’चे स्मार्टवॉच भारतात

टायटन कंपनीने ‘जक्स्ट प्रो’ श्रेणीतील स्मार्टवॉच भारतात आणले असून त्याची किंमत २२९९५ रुपये इतकी आहे. अ‍ॅपल आणि अँड्रॉइड या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकणारे हे ‘स्मार्टवॉच’ फ्लिपकार्ट तसेच अन्य ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून विक्रीस उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The importance of mobile game for indian
First published on: 06-09-2016 at 01:03 IST