भारतीय बाजारपेठेला मोबाइलशी परिचित करून देणाऱ्या नोकिया कंपनी सध्या अस्थिर झाली असली तरी, या कंपनीतर्फे नवनवीन मोबाइल बाजारात आणले जात आहेत यापैकीच ‘नोकिया १३०’ हा नुकताच भारतात दाखल झाला. अवघ्या १५९९ रुपये किमतीत उपलब्ध असलेला हा मोबाइल गरीब वर्गातील नागरिकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये इनबिल्ट एफएम रेडिओ आणि एमपीथ्री प्लेबॅकची सुविधा आहे. या फोनची स्क्रीन १.८ इंच आकाराची असून यात छायाचित्रण आणि व्हिडीओ रेकॉर्डिगचीही सुविधा आहे. या मोबाइलमध्ये मेमरी कार्डद्वारे ३२ जीबी स्टोअरेज वाढवता येते. तसेच या फोनची बॅटरी शक्तिशाली असल्याचा कंपनीचा दावा असून सलग ११.५ तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक बॅटरी चार्जिगविना होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयटेलचा पॉवरप्रो पी४१

‘आयटेल’ मोबाइलने आपल्या ‘पॉवरप्रो’ मालिकेत नवीन ४जी स्मार्टफोनची भर घातली आहे. ‘पॉवरप्रो पी-४१’ या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्याची ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी असून त्याद्वारे सलग ९५ तास संगीत ऐकणे शक्य असल्याचा कंपनीचा दावा आहे. अत्याधुनिक अ‍ॅण्ड्रॉइड नोगट ऑपरेटिंग सिस्टीम आणि १.३ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये एक जीबी रॅम पुरवण्यात आला आहे. या फोनची साठवण क्षमता आठ जीबी असून मेमरी कार्डच्या साह्य़ाने ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येते. ‘व्होल्ट’ (व्हॉइस ओव्हर एलटीई)/व्हिल्ट (व्हिडीओ ओव्हर एलटीई) यांनी युक्त असलेल्या या फोर-जी स्मार्टफोनमध्ये अत्यंत वेगाने डेटा ब्राऊजिंग करता येते, डाऊनलोडिंगही अधिक वेगवान आहे आणि ध्वनीचा दर्जा सुधारित आहे. ५९९९ रुपये किमतीमध्ये हा स्मार्टफोन ग्रॅफाइट, सिल्व्हर ग्रे आणि श्ॉम्पेन या मोहक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

जिवीचा पहिला स्मार्टफोन

‘जिवी मोबाइल’ या कंपनीने स्मार्टफोन बाजारात प्रवेश करत पदार्पणातच पाच स्मार्टफोन सादर केले आहेत. हे स्मार्टफोन ३,३३३ ते ६५९९ रुपयांच्या किमतीतील आहेत. या स्मार्टफोनसोबत कंपनीने दुहेरी वॉरंटी देऊ केली असून त्याद्वारे वापरकर्त्यांना नि:शुल्क ‘रिप्लेसमेंट’सोबत खरेदीपासून १११ दिवसांच्या आत मोफत ‘स्क्रीन रिप्लेसमेंट’ची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टफोनसोबत टेंपरड् ग्लास, प्रोटेक्टिव्ह केस आणि फ्लिप कव्हरदेखील मोफत देण्यात येत आहेत.

रिकोचा बहुकार्यक्षम प्रिंटर

रिको इंडिया लि. या मुद्रणयंत्र निर्मिती क्षेत्रातील कंपनीने ‘रिको एमपी’ या श्रेणीअंतर्गत काही नवीन ‘मल्टिफंक्शनल’ प्रिंटर बाजारात आणले आहेत. कृष्णधवल रंगात मिनिटाला २५ ते ६० पाने मुद्रित करणाऱ्या या प्रिंटरमध्ये १.४६ गिगाहार्ट्झ क्षमतेचा इंटले प्रोसेसर असून यातून सलग ४७०० पाने मुद्रित करता येतात. या प्रिंटरला १०.१ इंची डिस्प्ले पुरवण्यात आला असून त्याद्वारे वापरकर्ते प्रिंटरला नियंत्रित करू शकतात. हे सर्व प्रिंटर सुमारे दोन लाख ते साडेआठ लाख रुपयांच्या किंमतश्रेणीत उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming mobile information
First published on: 05-09-2017 at 00:55 IST