मायक्रोसॉफ्टचा एक्सबॉक्स वन हा कन्सोल कसा आहे. श्रीधर वडाळकर, नेरुळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्सबॉक्स प्रकारातील सर्वात नवीन व्हर्जन म्हणजे एक्सबॉक्स वन. गेमिंग कन्सोलची मेमरी प्रोसेसरची क्षमता, या कन्सोलला अधिक उत्तम बनविते. याची प्रोसेसिंग क्षमता इतकी उत्तम आहे की, साधारण गेमचा लीडिंग टाइम हा २५ सेकंदांइतका कमी आहे. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात भारतात दाखल झालेल्या या कन्सोलमध्ये मायक्रोसॉफ्टने उत्तम, असे गेम्स उपलब्ध करून दिले आहेत. या कन्सोलमध्ये आपल्याला सर्वोत्तम असा व्हिडीओ एक्स्पीरियन्स घेता येतो. याचा इंटरफेस थोडा गोंधळून टाकणारा असला तरी यामध्ये नव्याने दाखल झालेल्या फीचरमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होते, ते म्हणजे याची स्क्रीन आपण आपल्या मोबाइल, टॅब्लेटवर शेअर करू शकता; जेणेकरून आपणास टायिपग करणं सोयीचं ठरत ज्यामुळे फेसबुकसारखे इंटरनेट अ‍ॅप्लिकेशन्स आपण सहजपणे वापरू शकतो व ऑप्शन्समध्ये टाइप करून सिलेक्ट करणे सोयीचे होऊन जाते. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे कीनेक्ट सुविधा जोडल्यावर एक्सबॉक्सचा गेमिंग एक्स्पीरीअन्स दुपटीने वाढतो

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is console gaming
First published on: 20-06-2017 at 03:24 IST