• मला टीव्ही घ्यायचा आहे. तर मी फोर के किंवा फुल एचडी पैकी कोणता घेऊ यामध्ये मी गोंधळलो आहे. तर यापैकी कोणता घ्यावा. – अजय देवधर

यामध्ये तुम्ही फोर केचा टीव्ही घ्यावा. कारण फुल एचडी आणि फोर केमध्ये पिक्सेलचा खूप जास्त फरक आहे. यामुळे  तुम्हाला चित्रांचा दर्जा फोर केमध्ये अधिक चांगला मिळू शकतो. फुल एचडीमध्ये १९२० बाय १०८० पिक्सेलचे रिझोल्युशन असते तर हेच रिझोल्युशन फोर केमध्ये ४००० बाय २१६० पिक्सेलचे मिळते. जेवढे पिक्सेल जास्त तेवढा चित्रांचा दर्जा चांगला असतो. यामुळे फोर केचा टीव्ही घेणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • मी संगणक शिकण्याचे अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड केले आहे. ते अ‍ॅप मला माझ्या लॅपटॉपवर पाहायचे आहे तर ते करता येऊ शकते का? संगीता सुळे

मोबाइलवर सध्या अनेक चांगले अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र हे सर्वच अ‍ॅप संगणकावर उपलब्ध आहेतच असे नाही. असे अ‍ॅप संगणकावर किंवा लॅपटॉपवर वापरता यावे अशी अनेकांची मागणी होती. ही मागणी दूर करण्यासाठी जागतिक आयटी हब म्हणून ओळख असलेल्या सिलिकॉन व्हॅली येथे ब्लूस्टॅक्स नावाची कंपनी सुरू झाली आणि त्यांनी ही गोष्ट शक्य केली आहे. क्लाऊड तंत्रज्ञाची मदत घेत कंपनीने हे शक्य केले आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संगणकावर http://bluestacks.com/  या संकेतस्थळावरुन ब्लूस्टॅक्स अ‍ॅप प्लेअर डाऊनलोड करून घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक खात्यावरून किंवा सुरू असलेल्या ई-मेल खात्यावरून नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक ब्लूस्टॅक्स पीन येईल. हा पीन सेव्ह करून ठेवा. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये ब्लूस्टॅक्स क्लाऊड कनेक्ट हे अ‍ॅप डाऊनलोउ करा. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर मोअरमध्ये जाऊन अ‍ॅप सिंक टू पीसी हा पर्याय निवडा व त्यावेळेस तुम्हाला ब्लूस्टॅक्स पिन विचारला जाईल. हा पिन दिल्यावर तुमचा फोन आणि संगणक कनेक्ट होऊन तुम्ही अ‍ॅप लॅपटॉपवर पाहू शकता.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which tv series should i watch
First published on: 27-06-2017 at 01:09 IST