भारतीय समाजात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात मोठा सोहळा असतो. पदरी पैसा असो की नको, आर्थिक क्षमता असो की नसो, लग्नावर मात्र ऐपतीपेक्षा अधिक खर्च करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. वधुवराचा पोशाख, लग्नसोहळ्याची तयारी आणि जेवणखाण यासोबतच लग्नसमारंभातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो आहेराचा. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना परतीचा आहेर देण्याची प्रथा तर अलीकडे चांगलीच रुजू लागली आहे. त्यामुळे लग्नाचा बस्ता बांधताना ‘रिटर्न गिफ्ट’चीही तयारी केली जाते. परंतु, लग्नसमारंभात मानपानासाठी अडून बसणाऱ्यांची संख्या कमी नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक लग्नात मानपानावरून पाहुणेमंडळींचे टोमणे, नाराजी वधूवराच्या कुटुंबीयांना झेलावी लागतात. त्यामुळे परतीचा आहेर चांगला आणि पाहुण्यांना आवडेल, असा निवडतानाच तो आपल्या बजेटमध्येही बसेल, याकडे लक्ष द्यावे लागते. नेमकी हीच बाब हेरून ‘व्हाइटनाइफ’ नावाने सुरू झालेल्या स्टार्टअपमधून परतीचा आहेर पुरवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. तरुण उद्योजिका सोनिया अगरवाल यांनी ही कल्पना अस्तित्वात आणली असून या ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून परतीच्या आहेराचे वेगवेगळे पर्याय निवडता येतात.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whitenife startups sonia agarwal
First published on: 21-02-2017 at 04:55 IST