26 February 2021

News Flash

जाहिरात हक्कविक्रीतून टीएमटीला १० कोटी

३५० बसगाडय़ांवर जाहिराती प्रदर्शित करण्यास मुभा

(संग्रहित छायाचित्र)

विविध आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी व्यवस्थापनाने तातडीने पाउले उचलण्यास सुरुवात केली असून ३५० बसगाडय़ांवर जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामुळे तीन वर्षांसाठी उपक्रमाला १० कोटी ११ लाख ७२ हजार २४ रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे.

ठाणे परिवहनच्या ताफ्यातील ४३४ बसगाडय़ांवर जाहिरात प्रदर्शित करण्यासंबंधीचा प्रस्ताव २०१९ मध्ये प्रशासनाने तयार केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने इतर परिवहन उपक्रमांकडून यासंबंधीचे दर मागविले होते. त्यानुसार काही दर निश्चित केले होते. मात्र, ते कमी असल्यामुळे हि प्रक्रिया दोन वर्षांपासून थांबली होती. अखेर प्रशासनाने आता नव्याने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे. यापूर्वी ४३४ बसगाडय़ांसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यात बदल करून आता ३५० बसगाडय़ांसाठीच प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये ३० वातानुकूलीत बस, ४ साध्या बस, ११० स्टॅर्डड, ९० मिनी बस आणि जेएनयुआरयुएमअंतर्गत आलेल्या जुन्या ६६ आणि ५० तेजस्विनी बसगाडय़ांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:12 am

Web Title: 10 crore to tmt from sale of advertisement rights abn 97
Next Stories
1 चार महिन्यांपासून प्रेयसीच्या मृतदेहासोबत वास्तव्य; हत्या करुन भिंतीत गाडलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
2 मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाई
3 गावांचा ‘पाणीभार’ शहरांवर!
Just Now!
X