वसई- वसई विरार शहरात मागील 24 तासात 18 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या आता 226 एवढी झाली आहे. सोमवारी 20 नवीन रुग्ण बरे झाल्याने एकूण करोनामुक्त रुग्णांचा आकडा 125 एवढा झाला आहे.

सोमवारी प्रथमच 18 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या आता 226 एवढी झाली आहे. त्यात नालासोपारा मधील 9, विरार मधील 7 आणि वसईतील 2 रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी 20 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या 125 एवढी झाली आहे. तर 90 जण उपचार घेत आहेत.

वसई विरार दिवसाला आढळतात 4 ते 5 रुग्ण

रुग्ण संख्या 226 झाली असून दिवसाला सरासरी 4 ते 5 रुग्ण आढऴत आहे. वसई विरार शहरात पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला सोमवारी 50 दिवस पुर्ण झाले आहे. 20 मार्च रोजी वसईत पहिला करोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळू हळू रुग्ण संख्येत वाढ होत गेली. सुरवातीचे काही दिवस रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते. नंतर मात्र प्रमाण वाढत गेले. सोमवारी एकाच दिवसात 17 रुग्ण आढळळ्याने रुग्ण संख्या 225 वर पोहोचली आहे. यातील 112 रुग्ण करोनामुक्त झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे

शहरातील करोना रुग्णांची स्थिती

वसई- 53

नालासोपारा- 100

विरार-66

नायगाव 3

इतर 4

एकूण – 226

करोना मुक्त- 125

उपचार सुरू- 90

मयत- 11