News Flash

ठाणे: पाचपाखाडी परिसरात अज्ञातांनी 18 दुचाकी जाळल्या

ठाण्यात दुचाकी जाळण्याचं सत्र सुरूच

संग्रहित छायाचित्र

ठाण्यात दुचाकी जाळण्याचं सत्र सुरूच असून पाचपाखाडी परिसरात अज्ञातांनी  18 दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काहीसं भीतीचं वातावरण आहे.


सोमवारी रात्रीच्या सुमारास पाचपाखाडी भागातील हनुमान सोसायटी परिसरात या दुचाकी जाळण्यात आल्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. गाड्या जाळण्यामागे अज्ञातांचा नेमका काय हेतू असेल याचाही पोलीस आता तपास करत आहेत. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी पाचपाखाडी भागातच 9 दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या सायन आणि भिवंडीतही गाड्या जाळण्याचा प्रकार घडला होता. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार गाड्या जाळण्याच्या घटना घडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 9:08 am

Web Title: 18 motorcycles were gutted in a fire in panchpakhadi thane
Next Stories
1 मासुंदाकाठी नवी आसने, सेल्फी पॉइंट
2 मद्य, धिंगाण्यावर येऊरमध्ये बंदी
3 बालमहोत्सवासाठी प्रेक्षक पाचारण करण्याची वेळ
Just Now!
X