वसईतील करोना बाधीत तरुणाच्या तीन मित्रांनाही करोनाची लागण झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले आहे. यामुळे वसईतील करोना बाधीत रुग्णांची संख्या आता ५ एवढी झाली आहे. दुबईहून वसईत आलेल्या एका तरुणाला करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले होते.

या तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल शनिवारी संध्याकाळी मिळाला. यानंतर तिन्ही मित्रांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. या सर्वांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने लागण झालेल्या तिघे जण पंचविशीच्या वयोगटातील असून त्यात एका तरुणाीचा समावेश आहे. या तरुणांच्या आई वडिलांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. सध्या पालघर जिल्ह्यातील ६८० जणांना अलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचे दररोज अहवाल घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

अवश्य वाचा – करोनाचा धसका : दुधाच्या टँकरमधून प्रवास करणारे १२ कामगार पोलिसांच्या ताब्यात