19 October 2019

News Flash

डहाणू : नगरसेवक भावेश देसाईंना गोळीबार करीत लुटण्याचा प्रयत्न

दोघांनी त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारुन त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, देसाई यांनी बॅग न सोडल्यामुळे चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला.

डहाणूचे नगरसेवक आणि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक भावेश देसाई यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच मंगळवारी अज्ञातांकडून लुटण्याचा प्रयत्न झाला. या झटापटीत त्यांच्यावर चोरट्यांकडून गोळीबारही करण्यात आला मात्र, त्यातून ते सुदैवाने बचावले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हॉटेल सरोवरच्या मागील बुद्धदेवनगर येथील निवासस्थानाकडे देसाई मोटारसायकलवरुन जात होते. तेवढ्यात तेथे दबा धरुन बसलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारुन त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, देसाई यांनी बॅग न सोडल्यामुळे चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. यातील एक गोळी देसाई यांना स्पर्शून गेली असली तरी सुदैवाने गंभीर इजा झाली नाही.

या हल्ल्यानंतर देसाई यांना नजीकच्या डॉ. मेक्वान यांच्या शितल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची खबर मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

First Published on January 9, 2019 3:03 am

Web Title: a corporator of dahanu bhavesh desai attempt to rob and fired on him