14 August 2020

News Flash

डीजेच्या बंदीमुळे बॅन्जोला मागणी!

न्यायालयाने डी.जे.च्या वापरावर सणासुदीत बंदी आणल्याने खेडय़ापाडय़ांतील बॅन्जो पार्टीना मागणी वाढली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

न्यायालयाने डी.जे.च्या वापरावर सणासुदीत बंदी आणल्याने खेडय़ापाडय़ांतील बॅन्जो पार्टीना मागणी वाढली आहे. गणेशोत्सवादरम्यान या पथकांनी आपल्या दरामध्ये वाढ केली असली तरी ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आले आहे.

लग्नकार्यामधील एक अविभाज्य घटक असलेल्या बॅन्जो पथकाला डी.जे.मुळे मागणी कमी झाली. त्यामुळे बॅन्जो पथकामध्ये कार्यरत असणाऱ्या गरीब घरांतील तरुण मंडळींवर आर्थिक संकट ओढवले होते. नवनवीन गाण्यांचा दिवसरात्र सराव करून पूर्वी या पथकांना तासांवर पैसे दिले जायचे. मात्र महागाई वाढल्याने व वाहतुकीसाठी खर्च येऊ  लागल्याने हे पथक ८ ते १२ हजार रुपये इतकी रक्कम घेत असे.

डी.जे.समोर बॅन्जो पथकांचा टिकाव लागणे कठीण झाले होते. नवीन गाणी, त्यांचे मिक्स, मूड बदलणारी गाणी व मोठय़ा आवाजात हृदयाला धडकी देणारी गाणी लोकांना पसंत पडू लागली. २५ हजार रुपयांपासून पुढे या डी.जे. संचाचा खर्च होई व त्यामध्ये वाहतुकीसाठी ट्रक व रोषणाईचा अतिरिक्त खर्च होई. असे असताना नाचामध्ये झिंगण्यासाठी नागरिक डी.जे.ला पसंती देत असत. न्यायालयाने डीजेवर बंदी आणल्याने बॅन्जो पथकांना मागणी आली असून ही पथके, सध्या १५ ते २५ हजारांपर्यंतची आकारणी करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2018 2:41 am

Web Title: banjo demand for ban on the dj
Next Stories
1 गणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा
2 BLOG: चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी आलेला बाप्पा नास्तिकाला भेटतो तेव्हा…
3 ‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा
Just Now!
X