News Flash

भिवंडीत बसगाडी चोरणारे अटकेत

बसगाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या बसगाडीचे सध्याचे स्थळ शोधण्यास सुरुवात केले.

‘जीपीएस ट्रॅकर’ यंत्रणेच्या साहाय्याने आरोपींचा शोध

ठाणे : भिवंडी येथील कोनगाव भागात बसगाडी चोरणाऱ्या चौघांना कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. रमीज सैय्यद (२६), आलीम अन्सारी (३४), मोजिम अन्सारी (४६) आणि रुस्तम अन्सारी (३९) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १८ लाख रुपये किमतीची बसगाडी जप्त केली. बसगाडीमध्ये असलेल्या ‘जीपीएस ट्रॅकर’ या यंत्रणेच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले.

माजीवडा येथे राहणाऱ्या राजेश पुजारी यांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांची बसगाडी मुंबई-नाशिक महामार्गालगत उभी केली होती. शनिवारी सकाळी ते पुन्हा बसगाडी आणण्यासाठी गेले असता त्यांची बस गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी कोनगाव पोलीस ठण्यात तक्रार दाखल केली. या बसगाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या बसगाडीचे सध्याचे स्थळ शोधण्यास सुरुवात केले. त्यावेळी ही बसगाडी भिवंडीतील मानकोली भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने नारपोली पोलिसांच्या मदतीने या बसगाडीचा शोध घेऊन बसगाडी अडविली. आणि चौघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:07 am

Web Title: bus thief arrested in bhiwandi akp 94
Next Stories
1 कडोंमपातील रुग्णसंख्या उतरंडीला
2 दर्जा नसलेल्या कोविड रुग्णालयांचा प्रश्न ऐरणीवर
3 पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Just Now!
X