उपलब्ध नोकरीच्या संधी, नवनवीन अभ्यासक्षेत्राची निवड करून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत अचूक करियरची निवड करावी, यासाठी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे ठाण्यात प्रथमच मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पालक आणि विद्यार्थी यांच्यातील ताणतणाव दूर व्हावा यासाठी या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. १२, १३ मार्च रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.

व्यक्तिमत्त्व विकास, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता, त्यांच्या कौशल्यानुसार करियर क्षेत्राची निवड, आर्थिक परिस्थिती, ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असलेली क्षमता असे उपयोजित मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

करिअर निवडताना पालक आणि विद्यार्थी यामध्ये निर्माण होणारा ताण दूर कसा करता येईल, यावर मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते ३.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

संपर्क : गीतांजली लेले ९९६७५९२९२१