मध्य रेल्वेवर गुरूवारी पुन्हा एकादा वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, बुधवारीही मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक लागू केल्यामुळे अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले होते.

गुरूवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. तसेच प्रवाशांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. आज पुन्हा एकदा कल्याण ठाकुर्लीदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. दरम्यान, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी वेळापत्रकानुसार चालण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.