आपला भारत देश आणि त्यातही पश्चिम घाटाची चिंचोळी किनारपट्टी ही संपूर्ण जगात मसाल्याच्या पदार्थासाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो तो दालचिनी, लवंग आणि तमालपत्र. अशा प्रकारच्या सर्व वनस्पती अनादी काळापासून सह्य़ाद्रीमध्ये बहरतात. कॉमन ब्ल्यू बॉटल फुलपाखरांच्या सुरवंटांचे खाद्य म्हणजे झाडांची पाने.

मादी ब्ल्यू बॉटल फुलपाखरू खाद्य वनस्पतींच्या पानांवर पिवळ्या रंगांची अंडी घालते. या अंडय़ापासून बाहेर येणाऱ्या काळपट हिरव्या रंगाच्या सुरवंटावर भरपूर काटे असतात. अर्थातच हे काटे संरक्षणासाठी असतात. सुरवंट जसजसे मोठे होत जातात, तसतसे हे काटे कमी कमी होत जातात. वाढ झालेल्या सुरवंटाचा रंग गडद हिरवा असतो. त्याच्या दोन्ही अंगास पिवळे पट्टे असतात. तसेच पाठीवर डोक्याच्या जवळ एक पिवळा ठिपकाही असतो. सुरवंटाची पूर्ण वाढ झाली की तो सुस्त होऊन कोष विणायला घेतो. हे कोष हिरव्या रंगाचे असतात.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड

कोषामधून बाहेर पडणाऱ्या आणि पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराचे पंख हे काळ्या रंगांचे असतात. पुढच्या पंखांवर (फोर विंग) मध्य भागामध्ये हिरवट-निळ्या रंगांच्या ठिपक्यांची माळ असते. हे ठिपके पंखांच्या टोकांकडून धडाकडे मोठमोठे होत जातात. पंखांच्या मागच्या जोडीवरही (हाइड विंग) बरोबर मध्यभागी असेच हिरवट निळे ठिपके असतात. शिवाय मागील पंखांच्या कडेला अशाच ठिपक्यांची माळ असते. हा निळा रंग चमकदार असतो. त्यामुळे हे फुलपाखरू फार आकर्षक दिसते. स्वॉटाटेल कुळातील इतर फुलपाखरांप्रमाणेच हे फुलपाखरूही मोठय़ा आकाराचे असते.

या फुलपाखरांना दमट, ओलसर हवा, भरपूर पाऊस गर्द झाडी असणाऱ्या प्रदेशातील हवामान मानवते. असे हवामान सह्य़ाद्रीच्या डोंगरांमध्ये अगदी सहज उपलब्ध असते. शिवाय सुरवंटांचे खाद्य असणारी लॉरेसिया कुळातील वनस्पती उदा. दालचिनी. सह्य़ाद्रीमध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतेच. शिवाय उत्पादनासाठी त्याची खास लागवडही केली जाते. त्यामुळे सह्य़ाद्रीमध्ये ही फुलपाखरे सहज सापडतात. ठाणे जिल्ह्य़ाच्या दक्षिणेकडील भाग आणि त्यापुढील सर्व दक्षिण भारतात ही फुलपाखरे आढळतात.

जवळपास सर्व फुलांवर मध गोळा करताना ही फुलपाखरं दिसतातच. शिवाय पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी साचणाऱ्या डबक्यांच्या जवळपासही ही फुलपाखरे पाणी शोषताना आढळतात. याशिवाय गाई-म्हशींचे मलमूत्र, कुजणारी फळे, मांस यांमधील जीवनरस शोषून घ्यायलासुद्धा फुलपाखरांना आवडतो. अनेकदा ही फुलपाखरे स्थलांतर (लोकल मायग्रेशन) करताना आढळतात.