ठाणे : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांविरोधात दाखल झालेल्या खंडणी प्रकरणात ठाणेनगर पोलिसांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या तारिक परवीन याला अटक केली आहे.

तक्रारदाराच्या मित्राशी तारिक याने संपर्क साधून निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि  निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासाठी २० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. तारिकला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना  २०१८ मध्ये  सट्टेबाजी प्रकरणात तक्रारदाराला अटक झाली होती.