पथकांच्या संख्येवर मर्यादा; पोलिसांच्या सूचनेनुसार मिरवणुका

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

गुढीपाडव्याला स्वागतयात्रेतील ढोलपथकांच्या दणदणाटावर यंदा नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. शहरातून निघणाऱ्या स्वागतयात्रेत या वेळी मर्यादित ढोलपथके असतीलच; मात्र त्यातील सदस्यसंख्याही ठरवून दिलेली असेल. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी हा उपाय केल्याचे स्पष्ट करण्यात आले. पथकांनीही पोलिसांच्या सूचनेनुसारच स्वागतयात्रा पार पाडण्यात येणार असल्याचे सांगितले.

ढोलताशांच्या दणदणाटामुळे होणारे हे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस, कल्याण डोंबिवली महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलत स्वागतयात्रा मंडळांना ढोलताशा पथकाविषयी काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या पथकांबरोबरच स्वागतयात्रा मंडळावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

श्रीगणेश मंदिर संस्थान डोंबिवली यांच्या वतीने गेली १८ वर्षे डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रेचे मोठय़ा जल्लोषात आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त मंगळवारी गणेश मंदिरातील विनायक सभागृहात एक बैठक पार पडली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष अच्युत कऱ्हाडकर म्हणाले, डोंबिवलीच्या स्वागतयात्रेत सहभागी होण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. गुढीपाडव्याला गणेशपूजन झाल्यानंतर मंदिरातून पालखी निघते.

[jwplayer BN5kD9S7]

ढोलताशांच्या गजरात पालखीचे स्वागत केले जाते. पूर्वी केवळ दोन ते तीन ढोलताशा पथके शहरात होती. मात्र गेल्या काही वर्षांत या पथकांत वाढ झाली आहे. स्वागतयात्रेत पथकांची संख्या वाढल्याने यात्रेदरम्यान चित्ररथांना मार्गक्रमण करताना अडथळा निर्माण होत असल्याने या पथकांना थेट मिरवणुकीत सहभागी न करून घेता चौकाचौकात जागा देण्याचा निर्णय आयोजकांनी दोन वर्षांपूर्वी घेतला. या ढोलताशा पथकांत आपापसात स्पर्धा असल्याने दरवर्षी पथकातील सदस्यांची संख्या ही वाढत जात होती. तसेच एकमेकांना दाखवून देण्यासाठीही त्यांच्याकडून जास्तीत जास्त आवाजात ढोल व ताशांचा गजर केला जात असे. मात्र यंदा या ध्वनीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून त्यासंबंधी स्वागतयात्रा आयोजन समितीला पोलिसांनी सूचना केल्या आहेत.पोलिसांच्या सूचनेनुसार यंदा स्वागतयात्रेत बदल करण्यात आले आहेत. १ किलोमीटर अंतरावर एक ढोलताशा पथक असेल.

तसेच पथकामध्ये १५ ढोल व ६ ताशेवादक असतील. यामुळे ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही असे कऱ्हाडकर यांनी सांगितले.

आतापर्यंत सहा ढोलताशा पथकांची नोंदणी झाली असून आणखी तीन ढोलताशा पथके यात्रेत सहभागी होतील, अशी अपेक्षाही कऱ्हाडकर यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केली.

  • श्रीगणेश मंदिर संस्थानच्या स्वागतयात्रेतील ढोलपथकांची संख्या कमी. पथकातील सदस्यांच्या संख्येवरही मर्यादा
  • डोंबिवलीतील स्वागतयात्रेची सुरुवात ढोलताशांच्या गजरातच; मात्र त्याच्या आवाजावर नियंत्रण ठेवणार.

[jwplayer o9O5Yb2J]