मोटारसायकल चोऱ्यांमध्ये वाढ

ठाणे – मिरारोड भागात राहणारे ३२ वर्षीय व्यक्ती मंगळवारी काही कामानिमित्त ठाण्यात आले होते. त्यांनी पश्चिमेतील सेंट झेवियर स्कूलच्या मुख्य गेट समोरील शनी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत १५ हजार रुपये किंमती मोटारसायकल उभी केली होती. ती चोरटय़ांनी चोरून नेली. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पश्चिमेतील सावरकरनगर येथील राधाकृष्ण अपार्टमेंट राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने सोमवारी रात्री इमारतीखाली पार्क केलेली ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीस गेली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये दोन ठिकाणी मोबाइल चोरी

कल्याण – पश्चिमेतील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणारी २८ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी घरी मुलीला खेळवित होती. त्यावेळी चोरटय़ाने त्यांच्या नकळत कपाटावर ठेवलेला तीन हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. तसेच पश्चिमेचील धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारी २४ वर्षीय महीला गुरुदेव हॉटेल समोरील रस्त्यावरुन जात असताना त्यांच्या हातातील २० हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरटय़ाने पळविला. दोन्ही मोबाइल चोरीप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसूत्र चोरीची घटना

कल्याण – पूर्वेतील योगिराज सोसायटीत राहणारी ४५ वर्षे महिला बुधवारी पती व मुलीसोबत हळदीचा कार्यक्रम संपवुन घरी परतत होती. रात्री ११ च्या सुमारास काटेमानिवली नाक्यावरील रोडवरुन जात असताना मोटारसायकलवर आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळयातील दोन मंगळसूत्र खेचून पोबारा केला. मंगळसुत्राची किंमत सुमारे एक लाख ६२ हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साडे तीन लाखांची घरफोडी

ठाणे – येथील भंडारआळीतील सुहास सदनमध्ये राहणारी ५० वर्षीय महिला बुधवारी सकाळी भाजी आणण्याकरिता मार्केटमध्ये गेली होती. त्या संधीचा फायदा घेत चोरटय़ाने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातील ३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.