News Flash

फेरीवाल्यांच्या जिवावर गुंड, अधिकाऱ्यांची दुकानदारी

फेरीवाले हे काही राजकीय, गुंड, प्रशासकीय व्यवस्थांच्या उपजीविकेचे साधन आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई धूमधडाक्यात सुरू असली, तरी स्कायवॉकवरील फेरीवाले बिनधास्तपणे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची ये-जा करण्याची जागा अडवून व्यवसाय करीत आहेत.

फेरीवाले हे काही राजकीय, गुंड, प्रशासकीय व्यवस्थांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे ही मंडळी या फेरीवाल्यांना पाठबळ देऊन जबरदस्तीने व्यवसाय करण्यास भाग पाडतात, असे फेरीवाल्यांच्या चर्चेचून समजते. पालिकेच्या हद्दीत स्कायवॉक परिसर येतो. परंतु, फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख व त्यांचे सहकारी जोपर्यंत आयुक्तांकडे तक्रार जात नाही, तोपर्यंत आपले ‘दुकान’ सुरू ठेवतात. आयुक्तांनी आदेश दिले की, मग फेरीवाल्यांना हटविण्याच्या कारवाईचा देखावा करतात, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:45 am

Web Title: hawkers trouble in kalyan
टॅग : Hawkers,Kalyan,Trouble
Next Stories
1 कल्याणमध्ये डॉक्टरांसाठी कार्यशाळा
2 मराठी भाषा समृद्धीचे ‘गुरुकुल’
3 वसईच्या ‘कॅरल सिंगिग’मध्ये पर्यावरण रक्षणाची धून
Just Now!
X