News Flash

पालिकेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक

तिघांकडून प्रत्येकी तीन लाख उकळले; आरोपींमध्ये पालिका कर्मचारी

तिघांकडून प्रत्येकी तीन लाख उकळले; आरोपींमध्ये पालिका कर्मचारी

ठाणे महानगरपालिकेत शिपाईपदावर नोकरी लावण्यासाठी तीन तरुणांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर याप्रकरणी कासा पोलिसांनी त्रिकुटाला अटक केली आहे. यातील दोघे जण ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून बनावट नियुक्त आणि ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.

कासा भागातील धरमपूर येथे राहणारा दिनेश कवटे यास ठाणे महानगरपालिकेत बांधकाम विभागात शिपाईपदावर नियुक्तपत्र,ओळखपत्र मिळाल्यानंतर मोठय़ा उत्साहात कामावर रुजू होण्यासाठी गेला होता. इतर दोन तरुणही त्याच्यासोबत या पदावर रुजू होण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडील नियुक्तपत्र तसेच ओळखपत्र पाहिले असता आयुक्तांनी ही आपली सही नसून सदरचे पत्र बनावट असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर या तरुणांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कासा पोलिसात रीतसर तक्रार नोंदवली.

दिनेश कवटे याच्यासह शैलेश भोये  रा.कळमदेवी आणि  संतोष यादव रा.कासा  अशी फसवणूक झालेल्या तिघांची नावे आहेत.  तर आरोपी अंकुश घुटे, सागर घुटे दोघेही रा.भोवाडी (धरमपूर), जयवंत कोठरे  रा. पातलीपाडा, ठाणे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उतम लिंबाजी मोरे रा. चिरागनगर ठाणे, सविता कांबळे रा.ठाणे यांचाही या गुन्हात समावेश असल्याची तक्रार आहे. हे दोघेही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. या टोळीने  अशा प्रकारे एकूण १५ तरुणांची फसवणूक केल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रकाश सोनवणे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

जिल्हयाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एक तपासपथक मंगळवारी ठाणे येथे जाऊन आले. मात्र प्रथमदर्शनी तशी कोणी व्यक्ती ठाणे येथे असल्याचे दिसत नाही. या गुन्हयाचा सूत्रधार सागर घुटे असल्याचे निष्पन्न होत आहे. तरी सर्व शक्यता तपासण्याचे काम सुरु  असुन लवकरच सर्व धागेदोरे हाती लागतील.    – प्रकाश सोनवणे, प्रभारी पोलीस अधिकारी ,कासा पोलीस स्टेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:45 am

Web Title: job recruitment fraud at thane municipal corporation
Next Stories
1 बीएसयूपी योजनेचा निधी परत
2 ठाण्यात मेट्रोकोंडी
3 दूषित पाण्याचा शोध घेणे शक्य
Just Now!
X