News Flash

बदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे?

एकीकडे महागाई वाढते आहे. तर दुसरीकडे ठेवींचे दर कमी होत आहेत.

बदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे?

‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रम उद्या कल्याणमध्ये

एकीकडे महागाई वाढते आहे. तर दुसरीकडे ठेवींचे दर कमी होत आहेत. अशा वेळी भविष्यातील तरतूद म्हणून कोणता मार्ग किती प्रमाणात अंगीकारावा? त्यासाठीचे नियोजन कसे करावे, याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर उपलब्ध झाले आहे.यानिमित्ताने येत्या रविवार, १५ डिसेंबर रोजी कल्याणमध्ये तज्ज्ञ अर्थ नियोजनकारांचे गुंतवणूक मार्गदर्शन होत आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम सायंकाळी ६ वाजता सुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम) येथे होईल.

उत्पन्न व खर्च यांची सांगड घालतानाच भविष्यातील आर्थिक तरतुदीविषयी काय धोरणे असावीत; वयाच्या कोणत्या टप्प्यात आर्थिक नियोजन कसे असावे, याबाबतचे मार्गदर्शन अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे करतील. आर्थिक नियोजनाशी संबंधित सध्याची स्थिती, कुटुंबाचा खर्च व उद्दिष्टे तसेच भविष्यातील गरज याबाबतही ते या वेळी प्रकाश टाकतील.

गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या पसंतीचा अग्रक्रम असलेल्या म्युच्युअल फंड माध्यमातून गुंतवणूक व परताव्याचे ध्येय कसे साधता येईल याबाबत या प्रसंगी आर्थिक सल्लागार तृप्ती राणे मार्गदर्शन करतील. अन्य पर्याय व फंड यांची गुंतवणूक, परतावा तसेच जोखमीबाबत तुलना करतानाच फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े आदींबाबत त्या सांगतील.

या उपक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. कार्यक्रमासाठी काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहेत. यानिमित्ताने तज्ज्ञांमार्फत गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपस्थितांना मिळेल.

  • कधी? – रविवार, १५ डिसेंबर २०१९
  • सायंकाळी ६ वाजता – कुठे?
  • सुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम) – मार्गदर्शक व विषय
  • तृप्ती राणे – म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ
  • कौस्तुभ जोशी – अर्थनियोजन महत्त्वाचे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:20 am

Web Title: loksatta arthbhan economy solution akp 94
Next Stories
1 येऊरमधील पर्यटक संख्येत घट
2 गुडविन ज्वेलर्सच्या मालकांची ठाण्यातली मालमत्ता पोलिसांकडून जप्त
3 पालघर येथे वाघोबा उत्सव उत्साहात संपन्न
Just Now!
X