31 March 2020

News Flash

खरेदीवर बक्षिसे जिंकण्यासाठी शेवटचे तीन दिवस

जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू झालेला ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ येत्या रविवारी संपणार आहे.

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची रविवारी सांगता

ठाणे : खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले असून १६ फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. या खरेदी उत्सवात सहभागी होऊन ग्राहकांना सोन्या-चांदीच्या नाण्यापासून कार जिंकण्याची संधी मिळू शकते.

जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू झालेला ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ येत्या रविवारी संपणार आहे. त्यामुळे खरेदीसोबत बक्षिसे जिंकण्याचा आनंद मिळवण्याची संधी आता केवळ तीन दिवस आहे. या तीन दिवसांमध्ये खरेदी महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदी करून ग्राहकांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर, रेफ्रिजरेटर अशा भेटवस्तूंसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज् अशा आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी हर्बल्स, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डीजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरन्ट हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:04 am

Web Title: loksatta thane shopping festival sunday akp 94
Next Stories
1 उद्योगांसह आस्थापनांचे पाणी महागणार?
2 पगारासाठी पाणी रोखले
3 कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाची बाजी
Just Now!
X