News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक

अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकरनगर येथील चाळीत राहणारा धोंडीराम बनसोडे हा रंगकाम करतो.

छायाचित्र प्रातिनिधीक

जिवे मारण्याची धमकी देऊन गेली तीन वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. धोंडीराम तुकाराम बनसोडे (३५) असे या आरोपीचे नाव असून घरी बोलावून धमकावून गेली तीन वर्षे हा नराधम मुलीवर अत्याचार करत होता. अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकरनगर येथील चाळीत राहणारा धोंडीराम बनसोडे हा रंगकाम करतो. शेजारी राहणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी कारणावरून घरी बोलावून तो तिच्यावर अत्याचार करत होता.  मात्र सातत्याने होणाऱ्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ अंबरनाथ येथील  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी  धोंडीराम बनसोडे या नराधमाला अटक केली असून न्यायालयाने ६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 3:43 am

Web Title: man arrested for raping minor girl
Next Stories
1 जव्हार, मोखाडय़ातील बालमृत्यूच्या संख्येत वाढ
2 व्यापाऱ्यांच्या नाराजीची युतीला धास्ती!
3 ऐन गर्दीच्या वेळी सरकते जिने बंद
Just Now!
X