01 March 2021

News Flash

मंचेकर टोळीच्या गुंडाची ठाण्यामध्ये भोसकून हत्या

पोलीस पुढील तपास करत आहेत

छायाचित्र प्रातिनिधीक

ठाणे जिल्ह्यात एकेकाळी दहशत माजविणाऱ्या सुरेश मंचेकर टोळीचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विठ्ठल नवघरे या ३३ वर्षीय गुंडाची हत्या करून त्याचा मृतदेह डोंबिवलीतील एका नाल्यात फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली.

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील फेज – १ मधील बॉम्बे डाईंग कंपनी जवळ बुधवारी सकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या पोटावर भोसकून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह नंतर उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रूख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.

एकीकडे पोलीस ओळख पटविण्याच्या दिशेने तपास करत असतानाच या मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी त्याचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हा मृतदेह मंचेकर टोळीचा गुंड विठ्ठल नवघरे असल्याची खात्री पटली. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर नवघरे बंधूंनी विठ्ठलचा मृतदेह ताब्यात घेतला. विठ्ठलवर त्याच्या मूळ गावी वाशीम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील जनुना येथे अंत्यसंस्कार करणार असल्याचे नातलगांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 10:16 pm

Web Title: member of manchekar gand murdered in thane
Next Stories
1 कोपरी कोंडीमुक्तीचे नियोजन
2 १५ इमारतींच्या बेकायदा नळजोडण्या खंडित
3 वाढत्या उन्हाचा सापांनाही त्रास
Just Now!
X