मुंबईतील मार्गाचा विस्तार थेट ठाण्यापर्यंत

मुंबईतील पश्चिम किनारी भागातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने नरिमन पॉइंट ते गिरगाव-वांद्रे-वर्सोवा-कांदिवली दरम्यान आखलेल्या सागरी किनारा मार्गाचा विस्तार पुढे मार्वे-गोराई-मीरा-भाईंदरपासून थेट ठाण्यातील घोडबंदपर्यंत करण्याच्या हालचाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी या प्रकल्पाचा विस्तार करणे अनिवार्य आहे, असा दावा महानगर प्राधिकरणाने केला आहे. यासाठी या कामाच्या तांत्रिक-आर्थिक आणि वित्तीय व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

घोडबंदर मार्गावर उड्डाणपुलांच्या उभारणीनंतरही दिवसागणिक वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेता खाडीतून नवा मार्ग उभारण्याचा नवा पर्याय शोधला जात आहे. घोडबंदर खाडीत थेट गायमुख-पातलीपाडय़ापर्यंत या मार्गाचा विस्तार करता येईल का, याचा अभ्यास केला जात आहे. मुंबई क्षेत्रातील पश्चिम उपनगरांमधील वाहतुकीचा वाढलेला भार लक्षात घेता महापालिकेने नरिमन पॉईंट ते थेट कांदिवलीपर्यंत सागरी किनारा मार्गाचे नियोजन केले आहे. यासाठी आवश्यक असलेला सविस्तर प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला असून या अहवालाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबईतील पश्चिम किनारी क्षेत्रातून आखण्यात आलेल्या या मार्गाचा आवाका लक्षात घेता राज्य सरकारनेही या प्रकल्पात उडी घेतली आहे. मुंबईतील पश्चिम किनारी क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरू  शकेल अशा या प्रकल्पाचा विस्तार थेट मीरा-भाईंदपर्यंत केला जावा, अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा तातडीने विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्वे-गोराई-मीरा-भाईंदर ते थेट घोडबंदपर्यंत हा प्रकल्प नेता येईल का याची चाचपणी करण्याचे आदेश, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला दिले होते. महानगर विकास प्राधिकरणाने वडाळा ते ठाण्यापर्यंत मेट्रो प्रकल्पाची आखणी सुरू केली असून यासंबंधीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. एकीकडे पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रो प्रकल्पाची आखणी केली जात असताना किनारी मार्गाचा विस्तार थेट घोडबंदपर्यंत केल्यास महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने हा मोठा दिलासा ठरू शकेल. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या आदेशानुसार सागरी किनारा मार्गाच्या विस्ताराचा सविस्तर अभ्यास करण्याची प्रक्रिया महानगर विकास प्राधिकरणाने अखेर सुरू केली आहे.

घोडबंदरची कोंडी फोडण्याचे प्रयत्न

* मुंबई महापालिकेने कांदिवलीपर्यंत आखलेला सागरी प्रकल्प मार्वे-गोराईमार्गे मीरा-भाईंदर आणि ठाण्याच्या खाडीपर्यंत नेणे शक्य आहे का, याचा सविस्तर अभ्यास ‘स्टूप-दारशा कर्न्‍सोशिअम’ या सल्लागार कंपनीमार्फत केला जाणार आहे. या कामासाठी कंपनीला तब्बल ९ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार असून यासंबंधीच्या निविदेस नुकत्याच झालेल्या महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला.

* ठाण्याहून भाईंदर आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या ये-जा करण्यासाठी असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. या मार्गालगत उभ्या राहात असलेल्या बडय़ा गृहसंकुलांमध्ये वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले तीन उड्डाणपूल सध्या वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. याच मार्गावरून कासारवडवली ते ओवळ्यापर्यंत मेट्रोचा मार्ग जात असला तरी सागरी किनारा मार्गाचा पर्याय उपलब्ध झाल्यास घोडबंदरची कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकणार आहे.

* घोडबंदरच्या खाडीतून पातलीपाडा-कासारवडवली-गायमुखपर्यंत हा मार्ग नेता येऊ शकेल का याचा अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.