|| शलाका सरफरे

ठिकठिकाणी जाऊन मातृदुधाचे संकलन; ठाणे पालिकेची १ कोटीची तरतूद

स्तनदा मातांचे अतिरिक्त दूध संकलित करून ते आईच्या दुधाला पारखे झालेल्या नवजात बालकांना उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी मातृदुग्ध संकलन पेढी कार्यरत आहे.  याच धर्तीवर दुग्धसंपन्न मातांना रुग्णालयातून घरी गेल्यावरही दुग्धदान करता यावे, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवा रुग्णालयामध्ये लवकरच मातृदुग्ध संकलन वाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये एक कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ही दुसरी दुग्धसंकलन वाहिका असून सध्या पुण्यातील ससुन येथील बी.जे.रुग्णालयात अशा प्रकारची दुग्धसंकलन वाहिका कार्यरत आहे.

नवजात अर्भकाच्या पोषणासाठी मातेच्या दुधाची आवश्यकता असते. मात्र, अनेकदा शारीरिक व्याधींमुळे स्तनदा मातांना नवजात बाळाला दूध देता येत नाही. अनेकदा रस्त्यांवर नवजात अर्भकांना फेकल्याच्या घटना घडतात.

मातृदुग्ध संकलन वाहिका

  • दुग्ध संकलनासाठी नेमण्यात आलेले पथक दुग्धसंकलन वाहिकेने मातेच्या दरात जाऊन दुग्ध संकलन करु शकेल.
  • या वाहिकेमध्ये मातेला आरामात बसून दुग्धदान करता यावे यासाठी विशेष आराम खुर्ची, इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टमिल्क पंप, शीतपेटी, ठेवण्यात येणार आहे.
  • या वाहिकेमध्ये एक पाळणाही असणार आहे. जेणेकरुन दुग्धदात्री माता आपल्या बाळालाही सोबत ठेवू शकते.