मीरा-भाईंदर पालिकेकडून भाडेतत्त्वावर जागा

भाईंदर : वसई विरार-मीरा-भाईंदर या नव्या पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मिरा भाईंदर महापालिकेने पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी मीरा रोडच्या प्रभाग समिती कार्यालयातील जागा दोन वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा ठराव मंजूर केला आहे. याशिवाय पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयांसाठी जागा आरक्षित करण्यात आली असून त्याचे बांधकाम दोन वर्षांत केले जाणार आहे.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Thane Division, Devendra Fadnavis
ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक विधान
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच

वसई-विरार आणि मिरा भाईंदर या दोन शहरांचे मिळून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर २०१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता. मात्र नंतर त्याची प्रक्रिया मंदावली होती. आता राज्य शासनाने नव्या पोलीस आयमुक्तालयाच्या आयुक्तपदी सदानंद दाते यांची नियुक्ती केल्याने आयुक्तालय निर्मितीला वेग आला आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार ही दोन शहरे सलग असली तरी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे नवीन पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय  स्वत:च्या शहरात अशी नागरिकांची मागणी होती. आयुक्त दाते यांनी देखील नियुक्ती होतचच जागेचा शोध सुरू केला होता. मिरा भाईदर महापालिकेने मुख्यालयासाठी मिरा रोड येथील प्रभाग समितीची जागा दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

राम नगरातील प्रभाग समिती ६ च्या कार्यालयातील श्री पदमसार सूरीश्वरजी भवनात पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय तात्पुरत्या स्वरूपात उभारले जाईल. ही इमारत ३१ हजार २३४ चौ फूट क्षेत्राची एवढी प्रशस्त आहे. ही जागा २ वर्षांकरिता वार्षिक २९ लाख  रुपये भाडे तत्वावर देण्याचा निर्णय पालिका आयुक्त विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.