लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात अडसर ठरत असलेल्या सहा मीटरच्या २१ रस्त्यांचे नऊ मीटपर्यंत रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास अखेर राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा, उथळसर, राबोडी यांसह कळवा भागातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची कोंडी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फुटली असून यांमुळे शहरातील पाच हजारांहून अधिक इमारतींमधील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

ठाणे शहराचा मध्यवर्ती परिसर जुने ठाणे म्हणून ओळखले जाते. यामध्ये ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, नौपाडा, उथळसर, कोलबाड परिसराचा समावेश होतो. या भागांतील अनेक रस्ते सहा मीटरपेक्षा कमी रुंदीचे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) धोरणामुळे येथील अधिकृत इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. जुन्या ठाण्यातील दोन इमारतींमधील रस्ता किमान नऊ  मीटरचा हवाच, असा नियम राज्य सरकारने काढला होता. या नियमामुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला होता.

ठाणे शहरातील बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजनेसारखी मोठी योजना राज्य शासनाने जाहीर केली होती. मात्र, जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या ठाणेकरांच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष केल्याची भावना येथील नागरिकांमध्ये होती. याबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर महापालिका प्रशासनाने सुरुवातीला सहा मीटरचे रस्ते नऊ मीटरचे करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यामध्ये सुरुवातीला सहा रस्त्यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर त्यामध्ये आणखी १५ रस्त्यांचा समावेश करून शहरातील २१ रस्ते नऊ मीटरचे करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविला असून जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

रुंदीकरणाच्या प्रस्तावातील रस्ते

रामवाडी, हिंदू कॉलनी, बी केबिन, शेलारपाडा (कोलबाड), टिपटॉप प्लाझामागील त्रिमूर्ती लेन, ब्राह्मण सोसायटीतील पेंडसे लेन, देवधर रुग्णालय ते सहकार सोसायटी लेन, विष्णूनगर, सहयोग मंदिर, घंटाळी क्रॉस लेन, काका सोहनी पथ, राम मारुती रोड क्रॉस लेन, महर्षी कर्वे रोड, स्वामी विवेकानंद रोड, भास्कर कॉलनीतील गावंड पथ, राबोडी, मदनलाल धिंग्रा मार्ग, खारटन वसाहत रस्ता, शिवाजी महाराज चौक ते कळवा मेडीकल यांसह अनेक रस्त्यांचा रुंदीकरणाच्या प्रस्तावात समावेश आहे.

श्रेयवादाची लढाई

जुन्या ठाण्यातील पुनर्विकासातील अडसर दूर झाले असले तरी राजकीय पक्षांची मात्र यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. जुन्या ठाण्यात इमारती खेटून आहेत. तसेच कमी रुंदीचे रस्ते आहेत. या पाश्र्वभूमीवर नऊ  मीटर रुंद रस्त्यांची अट पुनर्विकासाला अडथळा ठरत होती. ही अट दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेत जुलै २०१८ मध्ये याबाबतचा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेनेच दाबून ठेवला. त्यामुळे जुन्या ठाण्यातील लाखो नागरिक अडचणीत आले होते. हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडून मंजूर व्हावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, असे ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. तर  शिवसेनेने हा प्रस्ताव दाबून ठेवला नव्हता. भाजपच्या नगरसेवकांच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा प्रस्ताव रखडला होता. नगरसेवक यादीतील रस्त्यांची नावे दरवेळेस बदली करत होते. त्यामुळे या प्रस्तावास उशीर झाला. हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मार्गी लागला आहे, असे  ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.