महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट विभागातील कोलशेत उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील भाईंदरपाडा व जी. बी. साऊथ तसेच वागळे इस्टेट उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील इन्कमर साळशेत ठाणे १ व २ तसेच लोकमान्य नगर उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील एअर फोर्स वीज वाहिनींचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवार व शुक्रवारी चालणाऱ्या या कामांमुळे ठाण्यातील काही भागांचा वीजपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
भाईंदरपाडा या वीज वाहिनीवरील भाईंदरपाडा, नागला बंदर रोड या परिसरांचा वीजपुरवठा गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, तर शुक्रवारी आर मॉल, वर्धमान वाटिका, विहंग-इन, नळपाडा, जहांगीर हाइट्स, ओरिअन बिझनेस पार्क, सिने वंडर परिसरांचा वीजपुरवठा सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे