अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या फॉरेस्ट नाका परिसरात तीन वर्षांच्या लहान मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लहान मुलीला तिची आई घरासमोर आंघोळ घालत होती. त्यावेळी त्या मुलीची आई अंघोळीचा साबण आणण्यासाठी घरात गेली असताना नराधम शाहरूख शाह याने संधी साधून मुलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. पीडित मुलीच्या आईने या घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना देत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. अंबरनाथ पोलिसांनी आरोपी शाहरूख शाहच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.