News Flash

मौज प्रकाशनचे संजय भागवत यांचे निधन

ठाण्यात एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे निधन.

प्रसिद्ध मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले; ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ठाण्यात एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मौजच्या विद्यमान सहाय्यक संपादक मोनिका गजेंद्रगडकर यांनी ही माहिती दिली.

दर्जेदार प्रकाशन संस्था म्हणून मौज प्रकाशनची महाराष्ट्राला ओळख आहे. या प्रकाशन गृहाचे माजी संपादक व प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या निवृत्तीनंतर १९९७ पासून ते २०१५ पर्यंत संजय भागवत यांनी प्रकाशक म्हणून मौजची धुरा सांभाळली. मात्र, २०१५ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळले. त्यानंतर पुढील चार वर्षे ते या आजाराशी झुंज देत होते.

उत्कृष्ट प्रकाशकासाठी देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत या राज्य पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे. श्री. पु. भागवतांपासूनची दर्जेदार लेखन सामग्रीच्या प्रकाशनाची परंपरा त्यांनी राखली यामध्ये त्यांनी अखेर पर्यंत कुठलीही तडजोड केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 7:13 pm

Web Title: sanjay bhagwat former publisher of mouj publications passed away
Next Stories
1 डहाणू, तलासरीतील घराघरांत भीतीचे ठाण
2 ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला उत्साही प्रतिसाद   
3 धावपटूंवरील अन्यायाचा जाब
Just Now!
X