ठाण्यातल्या नितीन कंपनी भागात गंजलेला सिग्नल कोसळून रस्त्यावर पडला. गुरूवारीच ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एसटी आगारातले होर्डिंग वाकल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरूवारीच असताना शुक्रवारी सिग्नल कोसळल्याची घटना घडली आहे. नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी सिग्नलमध्ये लोंबकळणारी वायर बसच्या छताला अडकली. ज्यामुळे हा सिग्नल थेट कोसळलाच. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा किती घटना झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे? असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत. कालचीच होर्डिंगची घटना ताजी असताना ही घटना समोर आली आहे.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास