पावसाळा असल्याने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलण्याचा एमआयडीसीचा प्रस्ताव नाकारत न्यायालयाने मंगळवारी दिघावासियांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. शासकीय-निमशासकीय जागांवरील अतिक्रमित बांधकामांवर जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात कुठलीही कारवाई करू नये हा शासननिर्णय असल्याने नेमके काय करावे या संभ्रमात असलेल्या एमआयडीसीने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दिघ्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत एमआयडीसी संभ्रमात 
मात्र, पावसाळ्यात इमारतीवर कारवाई शक्य नसली तरी या इमारती ताब्यात घेता येतील, असे न्यायालयाने आजच्या निकालात म्हटले. त्यानुसार, कमलाकर आणि पांडुरंग या इमारतींचा ताबा उद्याचा घ्यावा, असेदेखील न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे दिघावासियांच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत.
एकनाथ शिंदेंच्या घरासमोर राष्ट्रवादीचा ठिय्या