News Flash

प्रसिद्ध बिल्डर हिरानंदानी यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या भाजपाच्या सुधीर बर्गेला अटक

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. सुप्रसिध्द बिल्डर हिरानंदानी यांच्याकडे खंडणीसाठी तगादा लावल्याचा बर्गे यांच्यावर आरोप आहे. २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

सुधीर बर्गे यांनी ५० लाखांची मागणी केली होती. दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांनी माहिती अधिकारी कार्यकर्ते शौकत मुलानी आणि आरिफ इराकी यांना देखाली अटक केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

वेलकम टू ठाणे नावाने एक ग्रुप तयार करण्यात आला होता. वेलकम टू ठाणे हा त्यांचा कोड वर्ड आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील नामांकित व्यावसायिक आणि बिल्डर यांच्याकडे खंडणी मागण्याचे काम करण्यात येत होते. आणखी काही जणांची चौकशी करणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:34 pm

Web Title: thane anti extortion cell arrested sudhir barge
Next Stories
1 कल्याणमध्ये सफाईसाठी विहिरीत उतरलेले पाच जण बुडाले
2 पाणीटंचाई निवारणासाठी भूजल पुनर्भरण
3 डोंबिवलीत रस्तारुंदीकरणाचे वारे
Just Now!
X