पश्चिमेतील किसननगर येथील निधी सोसायटीत राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाने त्याची मोटार सायकल राहात्या घराजवळ उभी केली होती. १५ जून रोजी रात्री फिर्यादीची मोटारसायकल तसेच त्यांच्या नातेवाईकांची मोटारसायकल अज्ञात चोरटय़ाने चोरून नेली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कचरा गाडय़ांच्या बॅटऱ्या लंपास
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी येथील वाहनतळावर उभ्या असलेल्या कचरा गाडय़ांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याची घटना २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु होता. तसेच लाईट गेल्याने अंधाराचा फायदा घेत चोरटय़ाने दोन कचरा गाडय़ांतील बॅटऱ्या चोरी केल्या आहेत. सुरक्षारक्षकांनी याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र चोरी
डोंबिवली – पूर्वेतील मढवी शाळेजवळील बी. टी. पाटील सोसायटीत राहणाऱ्या ३१ वर्षीय शिक्षिकेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरल्याची घटना रविवारी घडली. ही महिला  शेजारी राहणाऱ्या महिलांसोबत कस्तुरी प्लाझा येथे एका कार्यक्रमास जाण्यास रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास निघाली. टाटा पॉवर लाईनच्या इथे येताच मोटारसायकलवर आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या गळय़ातील दागिने खेचले
बदलापूर : रात्री शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे दागिने दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी खेचून नेल्याची घटना बदलापूर पश्चिमेकडील भारत कॉलेजसमोरील रस्त्यावर घडली. हेंद्रेपाडा येथे राहणाऱ्या लक्ष्मी पारसे (४८) रात्री १० च्या सुमारास आपला भाचा कुमार यल्लापा याच्यासह भारत कॉलेजसमोरील रस्त्यावर शतपावली करीत होत्या. त्या वेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर दोन इसम आले. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने पारसे यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचली आणि ते दोघेही मांजर्ली बाजूकडे जाणाऱ्या रोडने भरधाव पळून गेले. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.