महापालिकेच्या अ‍ॅपला नागरिकांना उत्तम प्रतिसाद

इस्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर शहरातील पालिका, व्यावसायिक आणि नागरिक यांना एकाच डिजिटल व्यासपीठाने जोडणाऱ्या ‘डिजी ठाणे’ या अ‍ॅपचा शुभारंभ होताच ठाणेकरांनी या अ‍ॅपकडे आपला मोर्चा वळवला आहे. अवघ्या एका दिवसात ठाण्यातील १७५० नागरिकांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली. दुसरीकडे, पालिकेच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शहरातील बिल्डर, रुग्णालये आणि आस्थापनांचे मालकही पुढे येत असून आतापर्यंत दोनशेहून अधिक आस्थापनांनी अ‍ॅपवर नोंदणी केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

‘डिजीठाणे’ उपक्रमामुळे ठाणेकरांना एकाच व्यासपीठावर महापालिकेची विविध देयके भरण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय शहरातील मॉल तसेच अन्य आस्थापनांमध्ये ऑनलाइन खरेदी करणे शक्य होणार आहे. या शिवाय महापालिकेमार्फत शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या सूचना करणारा संदेशही या अ‍ॅपच्या माध्यमातून दिले आहेत.या अ‍ॅपवर नोंदणी करण्यासाठी ठाणेकर उत्सुक असल्याचे चित्र मागील २४ तासात दिसून आले आहे. महापालिकेच्या या योजनेत शहरातचील नामांकित बिल्डरांनी नोंदणी केली आहे. तसेच डीजी ठाणेद्वारे खर घरेदी करणाऱ्यांना ०.५ टक्के इतकी सवलतही काही बिल्डरांनी जाहीर केली आहे. नोंदणीकृत हॉटेलांमधील पाच टक्क्यांपर्यंत ही सवलत आहे. त्यामुळे २५ तासांत १७५० ठाणेकरांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. पुढील काळात हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वास  आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.   नागरिकांना अ‍ॅपवर नोंदणी करताना त्यांच्या परिसराचे नाव नोंद करावे लागणार आहे. अ‍ॅपमध्ये सर्वच परिसरांची यादी देण्यात आली असून त्यावर क्लिक करून परिसराचे नाव नोंद करता येते. त्यामुळे महापालिका क्षेत्राबाहेरील नागरिकांना या अ‍ॅपवर नोंदणी करता येऊ शकत नाही. मत्र, हे नागरिक ठाणे पालिका क्षेत्रात काम करत असतील तर त्यांना कार्यालयीन पत्त्यावर नोंदणी करता येऊ शकेल आणि त्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल. दुकानांत खरेदीसाठी डिजीकार्डची सुविधा हवी असल्यास अ‍ॅपवर तशी नोंदणी करता येईल.

करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

कार्ड नसले तरी नागरिकांना अ‍ॅप आणि संगणकाद्वारे खरेदी करता येऊ शकते. या उपक्रमांमध्ये शहरातील आस्थपनामध्ये ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधा अजून सुरू करण्यात आलेली नसली तरी अ‍ॅपद्वारे मात्र संबंधित दुकानातून सवलतीच्या दरात नागरिकांना खरेदी करता येऊ शकेल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

नोंदणी अशी करा..

  • मोबाइलमधील प्ले स्टोरमध्ये ‘डिजीठाणे’ असे सर्च करावे आणि त्यानंतर ‘डिजीठाणे- ठाणेसिटी डिजिटल सवर्ि्हस’ या अ‍ॅपवर क्लिक करून तो डाऊनलोड करावा.
  • अ‍ॅपवरील न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे आणि त्यानंतर अ‍ॅपवर असलेल्या रकान्यात नाव आणि आडनाव लिहून पुढे जावे. त्यानंतर जन्मतारीख, मोबाइल आणि ई-मेल आयडीची नोंदणी करावी. त्यानंतर वास्तव्यास असलेल्या परिसर तसेच घराची नोद करावी.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अ‍ॅपवरील स्क्रिनमध्ये मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड टाकून अ‍ॅपमधील सुविधेचा उपयोग करता येईल.
  • मोबाइलप्रमाणेच thanecity.gov.in या संकेतस्थळावरूनही नागरिकांना डिजी ठाणे उपक्रमात नोंदणी करून त्यावरील सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.