ठाणे महापालिकेची ‘ई’ टेंडरिंग प्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात; तीनच निविदा आल्याने आयुक्तही संभ्रमात

ठाणे महापालिकेमार्फत काढण्यात येणाऱ्या विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत ठराविक नगरसेवक, पदाधिकारी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने ठराविक निविदा िरग होऊ लागल्याच्या तक्रारी एकीकडे जोर धरु लागल्या असताना काही कामांसाठी केवळ तीनच निविदा कशा प्राप्त होतात, असा सवाल खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही सतावू लागला आहे. महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयुक्तांनी बुधवारी महापालिकेस सुट्टी असतानाही आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी विविध कामांच्या निविदा ‘ई’ निविदा प्रकियेद्वारे काढल्या जात असल्या तरी तरी केवळ तीनच निविदा कशा प्राप्त होतात असा सवाल उपस्थितांना करताच संबंधीत अधिकारीही अवाक झाल्याचे सांगण्यात येते. एखाद्या निविदा प्रकियेत चौथा आणि पाचवा निविदाकार आलाच तर त्याला बाद करण्याची जी प्रकिया आहे ती योग्य पद्धतीने होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. खुद्द जयस्वाल यांनाच पडलेल्या या प्रश्नांमुळे महापालिकेतील एकूणच कंत्राटी ठेकेदारांच्या निविदांविषयी निमाण झालेले संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे.

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीत कामे मंजुर करताना मोठय़ा प्रमाणावर टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप काही वषांपुवी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी केल्यानंतर राज्य सरकारने नंदलाल समितीची स्थापना केली होती. या समितीने ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामांमधील सावळागोंधळाची लक्तरे पुढे वेशीवर टांगली. ठाणे शहरातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर महापालिकेतील ठराविक नगरसेवकांच्या कायपद्धतीविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित झाले होते.

या आर्थिक वर्षांत महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने शेकडो कोटी रुपयांची कंत्राटी कामे आखली जात आहे. काही शे कोटींचे रस्ते, पुलांची बांधणी केली जाणार असून निवडणुकीच्या तोंडावर यानिमीत्ताने टक्केवारीला ऊत येईल असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेतील ठराविक कामांमध्ये जोरदार टक्केवारीचे राजकारण सुरु झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून ठराविक ठेकेदारांचे चांगभल करण्यासाठी निविदा िरग केल्या जात असल्याची चर्चा आहे. या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी स्वत जयस्वाल यांनी आयोजित केलेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनीही काही प्रश्न उपस्थित केल्याने टक्केवारीच्या चर्चेस बळ मिळू लागले आहे.

तीनच ठेकेदार कसे?

महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत जयस्वाल यांनी निविदा प्रक्रिया ‘ई’ टेंडर प्रक्रियेद्वारे होत असली तरी केवळ तीनच निविदा कशा प्राप्त होतात असा सवाल उपस्थित करताच काही अधिकारी निरुत्तर झाले. काही निविदा प्रक्रियामध्ये तीन नंतर आलेल्या निविदाकारांना किरकोळ कारणांवरून अपात्र ठरविण्यात येते. ठराविक ठेकेदारांचे चांगभल करण्यासाठी तर हे होत नाही ना, असा सवाल खुद्द जयस्वाल यांनी उपस्थित करत ज्या निविदाकारांना अपात्र केले जाते त्याची माहिती घेण्याची व त्यावर  योग्य निर्णय घेण्याचे काम करण्यासाठी एका छाननी समितीची स्थापना करण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला.