ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील मुलुंड या ठिकाणी असलेल्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना कफ आणि ताप असे दोन त्रास जाणवत होते. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असंही रुग्णालयाने म्हटलं आहे.

विवेक फणसाळकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी उपचारांसाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या पथकातल्या सहकाऱ्यांना मी सांगितलं आहे की करोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हीही अधिक काळजी घ्या”

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
MLA vaibhav naik On kiran samant
“किरण सामंत यांना उमेदवारीसाठी राणेंची लाचारी करावी लागतेय…”; वैभव नाईक यांनी डिवचलं
Sunita Kejriwal Speech
अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिल्या ६ गॅरंटी; सुनिता केजरीवाल यांनी सभेत पत्र वाचून दाखवत भाजपाला दिला इशारा