19 April 2019

News Flash

लोकलगर्दीचे तीन बळी!

मुंबईतील लोकल गर्दीमुळे प्रवाशांचा मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ट्रेनमधून खाली पडल्याने दोघांचा, तर डब्याच्या फटीत अडकून एकाचा मृत्यू ल्लमृतांमध्ये परदेशी नागरिक

मुंबईतील लोकल गर्दीमुळे प्रवाशांचा मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम रेल्वेवर गुरुवारी वाढत्या गर्दीमुळे तिघांचा बळी गेला. प्लॅटफॉर्मवरील गर्दीमुळे खाली ढकलला गेल्याने डब्याच्या फटीत अडकून नालासोपाऱ्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर लोकल ट्रेनमधून हात सटकल्याने खाली पडून दोन तरुण मृत्युमुखी पडले. त्यात एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे.

नालासोपाऱ्याच्या नाळे गावात राहणाऱ्या अ‍ॅलन रोझारियो (४०) हे गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे बोरिवलीे स्थानकात विरार लोकल पकडण्यासाठी आले होते. सव्वाआठ वाजताची विरार लोकल होती. ती लोकल पकडण्यासाठी फलाटावर तुफान गर्दी झालेलीे होती, परंतु ती पकडण्याच्या नादात मागून लोंढय़ाने दिलेल्या धक्क्याने अ‍ॅलन दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या फटीत पडले. ट्रेन थांबेपर्यंत ते आतमध्ये अडकले. त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झालीे. अ‍ॅलन यांना त्वरित उपचारासाठी कांदिवलीे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाळुंज यांनी दिली. फलाटावरील गर्दीमुळे दोन डब्यांच्या फटीत अडकून मृत्यू होण्याची ही दुर्मीळ घटना आहे. दोन डब्यांत जर संरक्षक जाळी बसवली, तर भविष्यात अशा घटना टाळता येतील, असे प्रवाशांनी सांगितले.

ट्रेनच्या डब्यातून हात सुटून खाली पडल्याने एका नायजेरियन नागरिकाचाही गुरुवारी रात्री मृत्यू झाला. गोरेगाव-जोगेश्वरीदरम्यान या नायजेरियन नागरिकांचा ट्रेनमधून हात सटकला आणि तो खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री १० वाजता याच मार्गावर गोरेगाव येथे हात सुटून पडल्याने रवीकुमार जैस्वाल (२२) या तरुणाचा मृत्यू झाला. या तिन्ही अपघातांप्रकरणीे बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपमृत्यू म्हणून नोंद केलीे आहे.

First Published on December 19, 2015 2:21 am

Web Title: three death due to local train rush